'जम्मूमध्ये सापडलेला दहशतवादी भाजपचा माजी IT सेल प्रभारी' #5मोठ्याबातम्या

जम्मू, भाजप

फोटो स्रोत, Twitter/ADGP Jammu

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा :

1.'जम्मूमध्ये सापडलेला दहशतवादी निघाला भाजपचा माजी IT सेल प्रभारी'

जम्मू पोलिसांनी लष्कर-ए-तोयबाच्या एका कट्टरवाद्याला अटक केलीय. तालिब हुसैन शाह असं त्याचं नाव आहे. जम्मू पोलिसांच्या माहितीनुसार, तालिब हा पूर्वी जम्मू भाजपच्या अल्पसंख्यांक मोर्चाचा सोशल मीडिया प्रभारी होता. एनडीटीव्हीनं ही बातमी दिलीय.

रविवारी सकाळी तालिब हुसैन शाह आणि त्याच्या साथीदारांना रहिवाशी भागातून नागरिकांनी पोलिसांच्या ताब्यात दिले.

पोलिसांनी त्यांच्याकडून एके-47, ग्रेनेड्स आणि इतर शस्त्रास्त्रं जप्त केली.

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

अटक केलेला तालिब हा कधीकाळी भाजपशी संबंधित होता, याबाबत भाजपचे प्रवक्ते आर. एस. पाठानिया म्हणाले की, "ऑनलाईन सदस्यता घेण्याचा हाच फटका आहे. कारण कुठलीही पार्श्वभूमी न तपासता तुम्ही सदस्यत्व देऊन टाकता."

दरम्यान, कुठलाही मोठा घातपात करण्याआधीच जम्मू पोलिसांनी तालिब आणि त्याच्या साथीदारांना अटक केली आहे.

2. सहा महिन्यात मध्यावधी निवडणुका, कामाला लागा - शरद पवार

"शिंदे-फडणवीसांचं हे सरकार सहा महिनेच टिकेल. त्यामुळे मध्यावधी निवडणुकांसाठी तयार राहा," अशा सूचना शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना दिल्या. न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दिलीय.

शिंदे-फडणवीसांचं सरकार राज्यात आल्यानंतर शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची बैठक मुंबईतीली वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये घेतली. बहुमत चाचणीच्या पूर्वसंध्येला पवारांनी राष्ट्रवादीच्या आमदारांच्या घेतलेल्या या बैठकीला महत्त्व आलं होतं.

शरद पवार

फोटो स्रोत, Twitter/Sharad Pawar

"ज्या आमदारांना मंत्रिपदाची महत्त्वकांक्षा आहे आणि त्यांना मंत्रिपद मिळालं नाही तर पुन्हा ते काही दिवसांत स्वगृही परतण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे नव्याने स्थापन झालेलं सरकार पुढच्या काही महिन्यांमध्ये सहज कोसळण्याची शक्यता आहे," असं पवार यावेळी म्हणाले.

3. 'मुस्लीम फेरीवाल्यांकडून खरेदी केल्यास 5100 रुपये दंड'

राजस्थानच्या उदयपूरमध्ये टेलर कन्हैयालाल यांच्या हत्येचा निषेध म्हणून गुजरातमधील बनासकांठामध्ये मुस्लीम फेरीवाल्यांवर बहिष्कार टाकण्यात आलाय. मुस्लीम फेरीवाल्यांकडून सामान खरेदी केल्यास 5100 रुपये दंड आकारण्याच निर्णय ग्रामपंचायतीनं घेतलाय. पत्रिकानं ही बातमी दिलीय.

बनासकांठाच्या वाघासन ग्रामपंचायतीच्या लेटरहेडवर हा फतवा व्हायरल झालाय.

मात्र, स्थानिक प्रशासनानं दिलेल्या माहितीनुसार, वाघासन ग्रामपंचायतीनं असा कुठलाच निर्णय घेतला नाहीय, त्यामुळे दंडाचं फर्मान हे अनधिकृत आहे.

बनासकांठाचे जिल्हा विकास अधिकारी स्वप्निल खरेंनी दिलेल्या माहितीनुसार, वाघासन ग्रामपंचायत सध्या प्रशासकाच्या हाती आहे. तिथं निवडणुका होणं बाकी असल्यानं सरपंच नाहीय.

4. 'बंडखोर आमदारांना विरोध का करता, जीवे ठार मारू'

"बंडखरो आमदारांना विरोध का करता? विरोध करणं बंद करा, अन्यथा जीवे ठार मारू," अशी धमकी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या स्वीय सहाय्यकानं केल्याचा आरोप जळगावचे शिवसेनचे सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ यांनी केलाय.

जळगाव शिवसेनेनं बंडखोर आमदारांविरोधात दोन जुलैला मोर्चा काढला. यावेळी सभेदरम्यानच शिंदेंच्या पीएचा फोन आल्याचं गुलाबराव वाघांनी सांगितलं. लोकसत्तानं ही बातमी दिलीय.

एकनाथ शिंदे

फोटो स्रोत, Twitter/CMO Maharashtra

धमकीच्या फोनवर प्रतिक्रिया देताना गुलाबराव वाघ यांनी आपण अशा धमक्यांना भीक घालत नसल्याचं वक्तव्य केलं.

तर "मी कुणाच्या बापाला घाबरत नाही. तुम्हाला जे करायचं आहे ते करा. बंडखोरांविरोधात शिवसैनिक एकवटला आहे. शिवसैनिकांची एकजुट अशीच राहील. आम्ही यापुढेही बंडखोरांचा विरोध करू," असं म्हणत शिवसेनेचे संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी शिवसैनिकांना हात जरी लागला तर जशास तसं उत्तर देऊ अशी प्रतिक्रिया दिली.

5. मोदींनी हैदराबादचा केला 'भाग्यनगर' असा उल्लेख

हैदराबादमध्ये भाजपच्या दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संबोधित केले. बैठकीच्या शेवटच्या दिवशी पीएम मोदींनी हैदराबादला भाग्यनगर असे संबोधित केले. सकाळ वृत्तपत्रानं ही बातमी दिली.

त्यानंतर आता या शहराचे नावही बदलणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे.

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

पंतप्रधान म्हणाले की, हैदराबाद हे भाग्यनगर आहे जे आपल्या सर्वांसाठी महत्त्वाचे आहे.

"हैदराबाद हे भाग्यनगर आहे. ज्याचे आपल्या सर्वांसाठी महत्त्व आहे. सरदार पटेल यांनी अखंड भारताचा पाया घातला आणि आता तो पुढे नेण्याची जबाबदारी भाजपची आहे," असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)