टीना डाबीनंतर अतहर आमिर खानही करणार दुसरं लग्न, फोटो पोस्ट करत म्हटलं...

अतहर आमिर खान आणि महरीन काझी

फोटो स्रोत, INSTAGRAM/DR_MEHREEN

फोटो कॅप्शन, अतहर आमिर खान आणि महरीन काझी
Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

यूपीएससी टॉपर IAS अधिकारी टीना डाबी यांच्याशी घटस्फोट झाल्यानंतर अतहर आमीर खान दुसरं लग्न करत आहेत.

अतहर यांनी इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्यांच्या होणाऱ्या बायकोचा फोटो शेअर केला आहे. फोटो शेयर करताना त्यांनी लग्नाची बातमी दिली आहे.

महरीन काझी असं त्यांच्या होणाऱ्या पत्नीचं नाव आहे.

महरीन डॉक्टर आहेत. त्यांच्या इन्स्टाग्राम प्रोफाईलनुसार, त्यांनी एमडी मेडिसीनचं शिक्षण घेतलं आहे आणि एका कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये डॉक्टर आहेत.

माध्यमांमधील बातम्यांनुसार, महरीन या मूळच्या काश्मीरच्या आहेत. त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटमध्ये त्यांनी स्वत:चा 'ड्रीमर आणि अचिव्हर' असा उल्लेख केला आहे. त्या दिल्लीतल्या राजीव गांधी कॅन्सर संस्थेत कार्यरत आहेत.

डॉक्टर सोबतच्या त्या फॅशन उद्योगाशीही संबंधित असल्याचं सांगितलं आहे. इन्स्टाग्रावर त्यांचे 2 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

महरीन यांनीही अतहर यांच्यासोबतचा फोटो इन्स्टाग्रावर टाकत लग्नाच्या बातमीला दुजोरा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याचं सांगितलं जात आहे.

टीना डाबी यांच्यासोबत पहिलं लग्न

2015 च्या बॅचमध्ये यूपीएससी परीक्षेत देशात दुसरा क्रमांक मिळवणाऱ्या अतहर यांनी याच बॅचमधील टॉपर टीना डाबी यांच्यासोबत लग्न केलं होतं. दोघांनी 2018 मध्ये लग्न केलं होतं.

दोघांचं लग्न आणि लव्ह स्टोरीविषयी सोशल मीडियावर मोठी चर्चा झाली होती. त्यांच्या लग्नात अनेक नेते आणि केंद्रीय मंत्रीसुद्धा सहभागी झाले होते. दुसरीकडे आंतरधर्मीय लग्न असल्यामुळे त्यांना टीकेचाहा सामना करावा लागला होता.

दरम्यान, 2021 मध्ये टीना आणि अतहर यांनी वेगळं व्हायचा निर्णय घेतला. दोघांनी कौटुंबिक न्यायालयात घटस्फोट घेतला होता.

टीना दाबी

फोटो स्रोत, fb

टीना दाबी यांनी 2020 मध्ये एक ट्वीट केलं होतं. ज्यामुळे त्यांच्या पहिल्या लग्नात अडचणी असल्याची चर्चा सुरू झाली होती.

त्यांनी सुटकेसचा फोटो टाकत लिहिलं होतं, "तुम्ही हे ओझं घेऊन चालू नये. तुमचा भूतकाळ, चुका, आशा-अपेक्षा आणि नकारात्मकता."

अतहर यांच्याशी घटस्फोट झाल्यानंतर मार्च 2022 मध्ये टीना यांनी दुसऱ्या लग्नाची घोषणा केली होती आणि त्यानंतर एप्रिल 2022 मध्ये प्रदीप गवांडे यांच्याशी दुसरं लग्न केलं.

टीना डाबी आणि प्रदीप गावंडे

फोटो स्रोत, Instagram

फोटो कॅप्शन, टीना डाबी आणि प्रदीप गावंडे

प्रदीप गवांडे हे 2013 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. ते टीना डाबी यांच्याहून 13 वर्षं वयाने मोठे आहेत. मूळचे महाराष्ट्राचे प्रदीप गवांडे राजस्थान केडरचे आयएएस अधिकारी आहेत.

अतहर आणि टीना यांची लव्ह स्टोरी

टीना आणि अतहर यांनी पहिली भेट 2016 मध्ये दिल्लीत एका पुरस्कार सोहळ्यादरम्यान झाली होती. तिथं दोघांचाही सन्मान करण्यात आला होता.

त्याच संध्याकाळी आमिर टीना यांच्या घरी गेले होते आणि मग तिथून त्यांच्या भेटीगाठी वाढायला लागल्या.

"आम्ही मे महिन्यापासून डेट करत होतो. तीन महिने मी त्यांना वाट पाहायला लावली. थोडा त्रास दिला आणि मग त्यानंतर लग्नाचा निर्णय घेतला," असं टीना यांनी बीबीसीला सांगितलं होतं.

टीना दाबी

फोटो स्रोत, fb

अतहर यांनी सांगितलं होतं की, "मी टीनासारखी गोड व्यक्ती कधीच पाहिली नाही. तिला पाहूनच मी तिच्या प्रेमात पडलो होतो. टीना माझ्या जीवनात आली त्यामुळे मी स्वत:ला नशीबवान समजतो."

टीना डाबी दिल्लीच्या आहेत आणि अतहर आमीर काश्मीरचे आहेत. आंतरधर्मीय लग्नामुळे त्यांच्या लग्नाविषयी अनेक बातम्या आल्या होत्या.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)