सिद्धू मुसेवालाची हत्या अशी झाली, दिल्ली पोलिसांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम

फोटो स्रोत, Getty Images
दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने पंजाबी गायक आणि काँग्रेस नेते सिद्धू मुसेवाला यांच्या हत्या प्रकरणाची माहिती दिली आहे.
सिद्धू मुसेवाला यांची हत्या नेमकी कशी झाली, याबाबत सविस्तर माहिती पोलिसांनी दिली आहे.
सिद्धू यांना सर्वप्रथम मन्नू नामक एका व्यक्तीने गोळी मारली. त्यानंतर इतर पाच बंदुकधाऱ्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला.
दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाचे प्रमुख एचजीएस धालीवाल यांनी सोमवारी (20 जून) एक पत्रकार परिषद घेतली.
ते म्हणाले, सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येत दोन टीम सहभागी होत्या. त्यांचा थेट संपर्क कॅनडात स्थायिक गँगस्टर गोल्डी ब्रार याच्याशी होता.
पोलिसांच्या माहितीनुसार, त्यांनी या प्रकरणात सहभागी असलेल्या 6 शूटर्सची ओळख पटवली आहे. सोमवारी पोलिसांनी 3 जणांना अटक केली. यामध्ये दोन मुख्य शूटर आहेत.
एचजीएस धालीवाल म्हणाले, "हल्लेखोरांनी हल्ला करण्यापूर्वी संपूर्ण परिसराचा दौरा अनेकवेळा केला होता. त्यांनी घटनास्थळाबाबत सगळी माहिती गोळा केली होती. अटक केलेल्या तीन शूटर्सकडून 8 ग्रेनेड, 9 इलेक्ट्रिक डिटोनेटर, 3 पिस्तुल आणि एक असॉल्ट रायफल जप्त केली आहे."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
पोलिसांनी सांगितलं, "प्रियवत फौजी (26 वर्षं) नामक एक व्यक्ती यातील एका गँगचा प्रमुख होता. तो गोल्डी ब्रारसोबत थेट संपर्कात होता. हल्ल्याच्या वेळीही गँगचं नेतृत्व प्रियवतनेच केलं होतं."
प्रियवतवर खूनाचे इतरही दोन आरोप आहेत. यामध्ये एक प्रकरण 2015 चं सोनिपतमधलं आहे, यात त्याला अटकही झाली होती. तर सोनिपतमध्येच 2021 मधील एका हत्या प्रकरणात पोलिसांकडून प्रियवतचा तपास सुरू होता.
फत्तेहगढमधील एका पेट्रोल पंपच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये प्रियवत दिसल्याचं पोलिसांनी सांगितलं. अटक केलेल्या दुसऱ्या शूटरचं नाव कैलाश (24 वर्षं) आहे. तोसुद्धा फत्तेहगढच्या पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आला होता.
हरियाणाच्या झझ्झरमध्ये 2021 मध्ये झालेल्या हत्या प्रकरणात पोलिसांकडून त्याचा शोध सुरू होता.
तिसरा आरोपी 29 वर्षीय केशव कुमार आहे. त्याला 2020 मध्ये पंजाबच्या भठिंडा येथील हत्या प्रकरणात अटक करण्यात आली होती.
कशी झाली हत्या?
एच. जी. एस. धालीवाल यांनी सांगितलं की सिद्धू मुसेवालांच्या हत्येत दोन गँग सहभागी होत्या. पहिली गँग बोलेरो गाडीत बसलेली होती. या गँगचं नेतृत्व प्रियवत फौजी करत होता.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
गाडीत ड्रायव्हर आणि मनप्रीत यांच्याशिवाय अंकित सिरसा आणि दीपक मुंडे हेसुद्धा होते.
दुसरी गँग कोरोला गाडीत बसलेली होती. यामध्ये मनप्रीत मन्नू ड्रायव्हरजवळ बसलेला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धू मुसेवाला घरातून बाहेर पडल्यानंतर संदीप सिंह नामक व्यक्तीने त्याची माहिती हल्लेखोरांना दिली.
यावेळी मुसेवालासोबत दोन मित्र होते. इतर कोणतीच सुरक्षा व्यवस्था उपलब्ध नव्हती.
दोन्ही गँगनी गाडीचा पाठलाग केला. यानंतर कोरोला गाडीने सिद्धू यांच्या गाडीला ओव्हरटेक केलं. यानंतर मनप्रीत मन्नूने एके 47 ने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. याच गोळ्या सिद्धू यांना लागल्या.
यानंतर कोरोला गाडीत बसलेले दोन व्यक्ती उतरले. तोपर्यंत मागून बोलेरोही तिथे आली. बोलेरो गाडीतून चार शूटर उतरले. यानंतर सहा जणांनी मिळून सिद्धूच्या गाडीवर गोळीबार केला.
हल्ल्यानंतर सगळे जण आपापल्या दोन गाड्यांमधून तिथून पळून गेले. पुढे काही अंतर गेल्यानंतर बोलेरो गाडीतील आरोपींनी ती गाडी तिथेच सोडून दिली.
केशवने त्यांना फतेहपूरला पोहोचवलं. हे सगळे जण काही दिवस तिथेच थांबले होते. त्यांना 19 जून रोजी अटक करण्यात आली.
आतापर्यंत काय-काय घडलं?
गायक सिद्धू मुसेवालाचं खरं नाव शुभदीप सिंह आहे. त्यांच्यावर पंजाबच्या मानसामध्ये जवाहरके गावाजवळ 29 मे रोजी हल्ला झाला होता. या हल्ल्यात मुसेवाला यांचा जागीच मृत्यू झाला.

फोटो स्रोत, Getty Images
त्यांच्या हत्येच्या एक दिवस आधी पंजाब सरकारने चारशेहून अधिक लोकांना दिलेली सुरक्षा काढून घेतली होती, हे विशेष.
या हत्येची जबाबदारी कॅनडास्थित गँगस्टर गोल्डी ब्रारने घेतली होती. त्यांनी एक फेसबुक पोस्ट लिहून सांगितलं की हे काम त्यांचंच आहे.
या हत्या प्रकरणात गोल्डी ब्रार गँग ही लॉरेन्स बिष्णोई गँगसोबत मिळून हे काम करत होती.
15 जून रोजी पोलिसांनी लॉरेन्स बिष्णोईला अटक करून न्यायालयात हजर केलं होतं. यानंतर लॉरेन्सला सात दिवसांच्या कोठडीत पाठवण्यात आलं आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
























