लालसिंग चड्ढावरून आमिर खानवर का होतेय टीका?

आमिर खान, लालसिंग चढ्ढा, फॉरेस्ट गंप

फोटो स्रोत, Viacom18

फोटो कॅप्शन, आमिर खान
Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

बॉलिवूडमधील 'मच अवटेड' अशा लाल सिंह चड्ढा या चित्रपटाचा ट्रेलर 29 मेला रिलीज झाला. या चित्रपटात 'मिस्टर परफेक्शनिस्ट' आमिर खान आणि अभिनेत्री करिना कपूर मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर IPL च्या फायनल्सवेळी नरेंद्र मोदी स्टेडियमवर लाँच करण्यात आला होता.

लाल सिंह चड्ढा हा चित्रपट फॉरेस्ट गंप या चित्रपटाचा ऑफिशिल हिंदी रिमेक आहे. या चित्रपटात 'फॉरेस्ट गंप' नावाच्या एका मुलाची गोष्ट आहे. हा चित्रपट 1986 मध्ये आलेल्या विन्स्टन ग्रूमच्या 'फॉरेस्ट गंप' या कादंबरीवर आधारित आहे. फॉरेस्ट गंपने 6 ऑस्कर जिंकलेत. हॉलिवूडमधील फॉरेस्ट गंप या चित्रपटामध्ये अभिनेता टॉम हँक्स यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे.

लाल सिंग चड्ढा या चित्रपटात आमिर खान आणि करिना कपूर यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. मोना सिंह आणि नागा चैतन्य ही या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहेत. लाल सिंग चड्ढाचा स्क्रीनप्ले अभिनेता अतुल कुलकर्णी यांनी लिहिला आहे. तर चित्रपटाचं दिग्दर्शन अद्वैत चंदन यांनी केले आहे.

लाल सिंग चड्ढाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून आमिर खानसह करीना कपूर ट्रोलर्स गँगच्या हिटलिस्टवर आले आहेत.

आमिर आणि करिनाच्या चाहत्यांची या चित्रपटाच्या ट्रेलरला पसंती मिळाली आहे. पण काही नेटकरी या ट्रेलरला ट्रोल देखील करत आहेत.

नेमका का ट्रोल होतोय लाल सिंह चड्ढा ?

तुम्ही जर लाल सिंह चड्ढाच्या ट्रेलरचा ओपनिंग शॉट पाहिला तर तो तुम्हाला फॉरेस्ट गंपच्या ओपनिंग शॉट सारखाचं दिसेल. जसं की फॉरेस्ट गंपमध्ये एक पंखा उडत उडत टॉम हॅंक्सच्या खराब झालेल्या बुटांजवळ येऊन पडतो.

तो पंखा टॉम हॅंक्स आपल्या सुटकेस मध्ये ठेवतो. अगदी असंच काहीसं तुम्हाला बघायला मिळेल लाल सिंग चड्ढाच्या ट्रेलर मध्ये. फॉरेस्ट गंपमध्ये प्रेसिडन्ट केनेडी यांचा सीन आहे तर लाल सिंग चड्ढामध्ये राष्ट्रपति के. आर. नारायणन यांच्याकडून अवॉर्ड घेताना. त्यामुळे ट्रेलर बघताना लाल सिंग चड्ढा हे फॉरेस्ट गंपचं हिंदी व्हर्जन वाटतं.

आमीर खान

फोटो स्रोत, Getty Images

लाल सिंग चड्ढाचा ट्रेलर आल्याबरोबर सोशल मीडियावर मिम्स आणि ट्विट्सचा महापूर आला.

काही ट्विटर युजर्स लाल सिंग चड्ढा फॉरेस्ट गंपची डिक्टो कॉपी असल्याचं म्हणतात.

दीपक कृष्णमूर्ती नावाचे एक ट्विटर युजर लिहितात, "हा माणूस टॉम हॅक्सच्या क्लासिक फॉरेस्ट गंपची नक्कल करण्याचा प्रयत्न करतोय, हा प्रकार बॉलीवूडच्या इतिहासातला अत्यंत वाईट प्रकार आहे."

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

नितीका सिंग नावाच्या युजर लिहितात, "जेव्हा मला समजलं की, लाल सिंग चड्ढा हा फॉरेस्ट गंपचा रिमेक आहे. तेव्हाच मी ठरवलंय की मी फॉरेस्ट गंप हा ओरिजिनल चित्रपट फ्री मध्ये पाहीन. आणि चित्रपटाच्या तिकिटांचे पैसे गरजू मुलांना दान करीन"

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

काही युझर्स हे या चित्रपटाला बायकॉट करण्याची मागणी ही करत आहेत. आमिर भारतीय संस्कृती आणि सभ्यतेबद्दल बरंच काही बोलला आहे, त्यामुळे त्याचे चित्रपट प्रदर्शित होऊ नयेत असं ट्विट करत या चित्रपटाला काही युजर्सने विरोध दर्शवला आहे.

X पोस्टवरून पुढे जा, 3
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 3

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)