औरंगाबादमध्ये अकबरुद्दीन ओवेसींनी घेतलं औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन, राज्यातलं राजकारण पेटलं

अकबरुद्दीन औवेसी

फोटो स्रोत, AIMIM

फोटो कॅप्शन, अकबरुद्दीन औवेसी
Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

एआयएमआयएमचे तेलंगणाचे आमदार अकबरुद्दीन ओवेसी औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत.

या दौऱ्याच्या वेळेस त्यांनी खुलताबाद येथे जाऊन औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेतलं आहे.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

यावेळी त्यांच्यासोबत औरंगाबादचे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील उपस्थित होते.

अकबरुद्दीन ओवेसी यांनी औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेतल्यानंतर राज्यातलं वातावरण तापलं आहे.

शिवसेना आणि भाजपनं यावर प्रतिक्रिया दिली आहे.

औरंगाबादचे शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी म्हटलं, "मुस्लिम लोक औरंगजेबाच्या कबरीवर जात नाही. कारण औरंगजेब दुष्ट होता. मुस्लिम आणि हिंदू समाजाला त्याने त्रास दिला. संभाजी महाराजांनाही त्रास दिला. अशा माणसाच्या कबरीवर जाऊन डोकं टेकवणं हा हिंदू-मुस्लिमांमध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न आहे."

औरंगजेब

फोटो स्रोत, PENGUIN INDIA

फोटो कॅप्शन, औरंगजेब

भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी याप्रकरणी बोलताना म्हटलं, "मुस्लिम असले तरी त्यांनी राष्ट्रभक्तीनं राहिलं पाहिजे. शिवछत्रपतींच्या महाराष्ट्रातील शिवभक्तांच्या भावना दुखावण्याचं काम त्यांच्या अशाप्रकारच्या कृतीनं होत आहे, त्याचा आम्ही निषेध करतो."

इम्तियाज जलील यांनी दिलं स्पष्टीकरण

इम्तियाज जलील यांनी याविषयी बोलताना म्हटलं, "खुलताबादमध्ये अनेक महापुरुषांचे दर्गा आहेत. खुलताबादला कुणीही गेलं तर तो औरंजेबाच्या समाधीवर जातो. त्यात काही वेगळा अर्थ काढण्याचं कारण नाही. खरं तर तिथं अनेक दर्गा आहेत.

"त्यामुळे तिथं गेल्यावर तुम्ही एकाच जागेवर जायचं, दुसरीकडे नको जायला असं नाही करू शकत. आता सगळे रंग आमचे झाले आहेत. हिरवा पण माझा आहे, भगवा पण माझा आहे आणि निळा पण माझाच आहे. त्यांना असं वाटत की भगव्यावर फक्त त्यांचीच मक्तेदारी आहे. आता सगळे रंग आमचेच आहेत."

'औवेसी स्कूल ऑफ एक्सलन्स'चं अकबरूद्दीन औवेसी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं.

यावेळी बोलताना ते म्हणाले, "आज भारतात सगळ्यात मागे मुस्लिम आहेत. मी मुस्लिमांसाठी बोलत होतो आणि बोलत राहणार. कारण मी लोकप्रतिनिधी आहे. जो मागास आहे त्याला ताकद देणं, पुढे आणणं आमचं काम आहे. तेच मी करत आहे. पण अनेकांना ते पाहावत नाही.

आज या शाळेच्या माध्यमातून मी मुस्लिम मुलांना राष्ट्र उभारणीत सहभागी करून घेत आहे. मुस्लिम, हिंदू, जैन सगळे पुढे गेले तर देश पुढे जाईल. पण कुणाला असं वाटत असेल तर फक्त एकाच्या धर्मानं देश पुढे जाईल, तर ते चूक आहे."

ते पुढे म्हणाले, "या शाळेत मुस्लिमच नाही, तर हिंदूंचीही मुलंही शिकू शिकतात. तुमचं हृदय आमच्यासाठी बंद असलं तरी आमचं हृदय तुमच्यासाठी खुलं आहे."

हेही वाचलं का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)