हैदराबाद : आंतरधर्मीय लग्नामुळे हिंदू तरुणाची मुस्लीम तरुणीच्या कुटुंबीयांकडून भररस्त्यात हत्या

Published
वाचन वेळ: 1 मिनिटे

आंतरधर्मीय लग्नामुळे नागराज नावाच्या एका तरुणाची त्याच्या मुस्लीम धर्मीय पत्नीच्या घरच्यांनी भररस्त्यात हत्या केल्याची घटना हैदराबादमध्ये घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जानेवारीत या दोघांचं लग्न झालं होतं. पण तिच्या घरच्यांचा त्यांच्या लग्नाला विरोध होता.

आसरिन आणि नागराज गेल्या 7 वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते आणि जानेवारी महिन्यात त्यांनी लग्न केलं होतं.

दोघाचं धर्म वेगळे होते. त्यामुळे नागराज यांची हत्या करण्यात आली. यावेळी ते दोघं गाडीवर चालले होते.

"भाऊ आणि नातेवाईक गाडीवर आले, त्यांनी नागराजला थांबवलं. त्यांना खाली पाडलं आणि डोक्यावर रॉडनं हल्ला केला. त्यानंतर नागराजचा मृत्यू झाला," असं आसरिन यांनी सांगितलं होतं.

बुधवारी (4 मे) रात्री नागराजच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी जात असताना ही घटना घडल्याचं आसरिन यांनी सांगितलं.

दरम्यान, लग्नानंतर हे दोघं विशाखापट्टणमला गेले होते. काही दिवसांनी ते परत आले. घरच्यांना आता लग्नाविषयी आपत्ती नसेल असं त्यांना वाटत होतं. पण, काल रात्री नागराज यांची हत्या करण्यात आली.

आतापर्यंत याप्रकरणी दोघांना अटक केल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

(ही बातमी अपडेट होत आहे)

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)