रोहित शर्माच्या नावावर असणाऱ्या 5 अनोख्या विक्रमांविषयी तुम्हाला माहितेय का?

रोहित शर्मा, भारत, क्रिकेट, मुंबई इंडियन्स, आयपीएल

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, रोहित शर्मा
Published
वाचन वेळ: 1 मिनिटे

'हिटमन' नावाने प्रसिद्ध रोहित शर्माचा आज वाढदिवस. टेस्ट, वनडे आणि ट्वेन्टी20 अशा तिन्ही प्रकारात खोऱ्याने धावा आणि खंडीभर विक्रम रोहितच्या नावावर आहेत. वाढदिवसाच्या निमित्ताने रोहितच्या नावावर असणाऱ्या खास विक्रमांविषयी

1.विश्वचषकात 5 शतकं

एका विश्वचषकात तब्बल 5 शतकं झळकावण्याचा पराक्रम रोहितच्या नावावर आहे. 2019 विश्वचषकात रोहितने दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, इंग्लंड, बांगलादेश, श्रीलंका यांच्याविरुद्ध शतक झळकावलं.

2.वनडेत 3 द्विशतकं

वनडेत तीन द्विशतकं झळकावण्याचा दुर्मीळ विक्रम रोहितच्या नावावर आहे. 2013 मध्ये रोहितने ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना पहिलं द्विशतक झळकावलं. 2014 मध्ये रोहितने श्रीलंकेविरुद्ध 264 धावांची मॅरेथॉन खेळी केली. 2017 मध्ये रोहितने श्रीलंकेविरुद्ध नाबाद 208 धावांची खेळी केली.

रोहित शर्मा, भारत, क्रिकेट, मुंबई इंडियन्स, आयपीएल

फोटो स्रोत, Getty Images

3.तिन्ही प्रकारात शतक

टेस्ट, वनडे आणि ट्वेन्टी20 प्रकारात अशा तिन्ही प्रकारात शतक झळकावणाऱ्या दुर्मीळ बॅट्समनमध्ये रोहितचा समावेश होतो. लोकेश राहुल, सुरेश रैना आणि रोहित शर्मा अशा तीनच भारतीय फलंदाजांना यांनी ही किमया साधली आहे.

4.आयपीएलची पाच जेतेपदं

रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्स संघाने इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेचं जेतेपद पाचवेळा पटकावलं आहे. 2013, 2015, 2017, 2019, 2020 असं पाचवेळा मुंबई इंडियन्स संघाने जेतेपदावर कब्जा केला आहे. आयपीएलमधल्या यशस्वी कर्णधारांमध्ये रोहितचं नाव अग्रणी आहे.

5.आयपीएलमध्ये भोपळ्यांचा नकोसा विक्रम

आयपीएल स्पर्धेत, सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणारा फलंदाज होण्याचा नकोसा मान रोहितच्या नावावर आहे. रोहित आयपीएल स्पर्धेत थोडंथोडकं वेळा नव्हे तर 14 वेळा शून्यावर बाद झाला आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)