प्रदीप मेहरा : ‘शांततेत काम करावं, यशाचा बोलबाला व्हावा’

प्रदीप मेहरा

फोटो स्रोत, VINOD KAPRI

फोटो कॅप्शन, प्रदीप मेहरा
Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

"शांततेत काम करावं, यशाचा बोलबाला व्हावा"

ही प्रतिक्रिया आहे प्रदीप मेहराची. सिनेदिग्दर्शक विनोद कापरींनीच प्रदीपचा हा नवा व्हीडिओ ट्वीट केला आहे.

लष्करीत भरतीचं स्वप्न पाहणाऱ्या प्रदीप मेहरा या तरुणाचा व्हीडिओ गेल्या दोन-तीन दिवसांपासून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. नोएडातील मॅकडॉनल्डमध्ये काम केल्यानंतर रात्री घरी परतताना प्रदीप 10 किलोमीटरहून अधिक अंतर पायी धावत घरी परततो.

सिनेदिग्दर्शक विनोद कापरींनी व्हीडिओ ट्वीट केल्यानंतर भारतासह जगभरातून प्रदीप मेहराचं कौतुक होत आहे.

यावेळी प्रदीप मेहरानं माध्यमांना विनंती केली की, "मला माझा धावण्याचा सराव करण्यासाठी वेळ द्यावा, मला कुणीही मुलाखतीसाठी किंवा बातमीसाठी बोलवू नये. माध्यमांमुळे मला माझ्या कामावर नीट लक्ष देता येत नाहीय."

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

गेल्या दोन दिवसांपासून प्रदीप मेहराच्या मागे माध्यमांनी अक्षरश: रांगा लावल्या होत्या.

लष्करात भरतीसाठी 'हा' तरुण रोज रात्री 10 किलोमीटर धावतो...

प्रदीप मेहरा या 19 वर्षीय तरुणाची सध्या सोशल मीडियार जोरदार चर्चा आहे. सिनेदिग्दर्शक विनोद कापरींनी ट्विटरवर शेअर केलेल्या व्हीडिओनंतर प्रदीपचं कौतुक होत आहे.

या कौतुकाचं कारणही तसंच आहे. प्रदीप रोज रात्री 10 किलोमीटर धावतो. प्रदीपचा धावतानाचा व्हीडिओ विनोद कापरींनी बनवला आणि त्यात त्यांनी प्रदीपला काही प्रश्नही विचारले.

असे रोज धावण्याचे कारण विचारले असता प्रदीपनं सांगितलं की, भारतीय लष्करात सहभागी होण्यासाठी शारीरीकदृष्ट्या फिट राहणं आवश्यक आहे, त्यामुळे मी रोज 10 किलोमीटर धावतो.

प्रदीप धावत असताना आणि धावताना प्रश्नांची उत्तरं देत असतानाचा व्हीडिओ विनोद कापरींनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून शेअर केला. हा व्हीडिओ प्रचंड व्हायरल झाला.

शनिवारी, 19 मार्चच्या संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास अपलोड केलेल्या या व्हीडिओला आतापर्यंत 6 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

प्रदीप नोएडाच्या सेक्टर 16 मधील मॅकडॉनल्डमध्ये काम करतो. नाईट शिफ्ट पूर्ण झाल्यानंतर प्रदीप घरी परतताना धावत निघाला असताना विनोद कापरींनी त्याला पाहिलं आणि त्याचं व्हीडिओ चित्रीकरण करत धावण्याचं कारण विचारलं.

यावेळी विनोद कापरींनी प्रदीपला गाडीनं घरी सोडण्याची ऑफरही दिली. मात्र, प्रदीपनं ती नाकारली आणि धावतच घरी जाणार असल्याचं सांगितलं.

'हे खरं सोनं आहे. नोएडाच्या रस्त्यावर काल रात्री 12 वाजता खांद्यावर बँग अडकवून धावणारा हा मुलगा दिसला. मला वाटलं, कुठल्या अडचणीत असेल, लिफ्ट दिली पाहिजे. वारंवर लिफ्ट देण्याची ऑफर दिली, मात्र त्यानं नकार दिला. त्याच्या नकाराचं कारण ऐकलंत तर तुम्हीही या मुलाच्या प्रेमात पडाल' - अशा कॅप्शनसह विनोद कापरींनी प्रदीप मेहराचा व्हीडिओ ट्वीट केला.

X पोस्टवरून पुढे जा, 3
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 3

प्रदीप घराच्या आर्थिक परिस्थितीमुळे नोएडातील मॅकडॉनल्डमध्ये का करतो. प्रदीप आणि त्याचा भाऊ असे दोघेजण एकत्र राहतात.

विनोद कापरींनी ज्यावेळी प्रदीपला लिफ्टची ऑफर दिली, तेव्हा तो म्हणाला, तुमच्याबरोबर कारमध्ये आलो तर माझं वेळापत्रक मोडेल.

X पोस्टवरून पुढे जा, 4
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 4

नंतर ज्यावेळी विनोदी कापरींनी त्याला रात्रीचं जेवण सोबत करण्याच ऑफर दिली, तेव्हा तो म्हणाला, मला घरी जाऊन माझ्यासाठी आणि भावासाठी जेवण बनवायचंय, कारण भाऊही नाईट शिफ्टला कामाला जातो.

रात्री धावण्याऐवजी सकाळी का धावत नाही, असं विचारल्यावर प्रदीप म्हणाला, सकाळी कामावर जाण्याआधी मला जेवण करावं लागतं.

प्रदीप मूळचा उत्तराखंडमधल्या अलमोडामधील आहे. तिथं त्याचे आई आणि बाबा असतात. आई आजारी असल्यानं बाबा तिची काळजी घेतात.

प्रदीप मेहराशी बीबीसीनं संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यानं प्रतिसाद दिला नाही. तसंच, विनोद कापरींना प्रतिक्रियेबाबत विचारलं असता, त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

X पोस्टवरून पुढे जा, 5
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 5

विनदो कापरींनी ट्वीट केलेल्या व्हीडिओखाली शेकडो कमेंट्स आल्या असून, त्यात प्रदीपचं कौतुक केलं गेलंय. कुणी प्रदीपला मदत करण्याची तयारी दर्शवलीय.

लेफ्टनंट जनरल (निवृत्त) सतीश दुआ म्हणाले की, प्रदीपच्या लष्करी प्रशिक्षणासाठी मी भारतीय लष्करातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बोललोय.

अभिनेता आर. माधवननं म्हटलंय की, हा माझा भारत आहे...

X पोस्टवरून पुढे जा, 6
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 6

अभिनेत्री काजल अग्रवालनं म्हटलंय की, प्रदीप, तू जिथे कुठे असशील - तुझ्यासाठी खूप सारं प्रेम आणि सदिच्छा पाठवतेय.

ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाईंनी प्रदीपच्या व्हीडिओला 'प्रेरणादायी' तर म्हटलंच आहे, सोबत हा व्हीडिओ भारतातील नोकरीसाठीची आशाही व्यक्त करतो.

व्हीडिओ ट्वीट केल्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे, रविवारी, 20 मार्चला विनोद कापरींनी नोएडातील मॅकडॉनल्डला भेट दिली आणि प्रदीपची चौकशी केली. त्यावेळ त्यांना कळलं की, प्रदीपला मित्र-परिवाराकडून बरेच फोन येत आहेत.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)