हिमंता बिस्वा सरमा : 'राहुल गांधींचे वडील खरंच राजीव गांधींच आहेत का'

राहुल गांधी

फोटो स्रोत, FACEBOOK/INC

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी उत्तराखंडमधील प्रचारसभेत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर टीका केलीय.

यावेळी त्यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा उल्लेख करत राहुल गांधींना निशाणा बनवलं.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

हिमंता बिस्वा सरमा म्हणाले, "जनरल बिपीन रावत आपल्या उत्तराखंड आणि देशाचे गौरव होते. त्यांच्या नेतृत्वात भारतानं पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक केलं. राहुल गांधींनी काय विचारलं, पुरावे द्या."

"अरे भाऊ, तुम्ही कुठल्या वडिलांचे पुत्र आहात, याचे पुरावे आम्ही कधी मागितले आहेत का?" असा प्रश्न सरमा यांनी विचारला.

सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागण्याच्या मुद्द्यावरून हिमंता बिस्वा सरमांनी राहुल गांधींवर याच भाषणात टीका केली. मात्र, यावेळी त्यांनी माजी पंतप्रधान आणि राहुल गांधींचे वडील राजीव गांधी यांचा उल्लेख केला.

हिमंता बिस्वा सरमा म्हणाले, "आमच्या सैनिकाकडून पुरावे मागण्याचा तुम्हाला काय अधिकार आहे? जर लष्करानं सांगितलं की, पाकिस्तानात बॉम्ब फोडला, तर फोडला. त्यावर पुन्हा का बोलायचं? तुमचा बिपीन रावत यांच्यावर विश्वास नाहीय का? उत्तराखंडचे सुपुत्र सैन्यात नोकरी करतात, त्यांच्यावर तुमचा विश्वास नाहीय का? जर ते सांगतायेत, सर्जिकल स्ट्राईक केलं, एअर स्ट्राईक केलं, तर केलं. त्यावर तुम्हाला का पुरावे हवेत?"

"मी कधी पुरावे मागितले का, की तुम्ही खरंच राजीव गांधींचे पुत्र आहात का? मागितले का पुरावे? मग तुम्हीही सैनिकांचा अपमान करू नका," असंही हिमंता बिस्वा सरमा म्हणाले.

हिमंता बिस्वा सरमा हे काँग्रेसमधून भाजपमध्ये आले आहेत. आसाम विधानसभा निवडणुकीत भाजपला बहुमत मिळाल्यानंतर त्यांना मुख्यमंत्री करण्यात आलं. सध्या ते आसामचे मुख्यमंत्री म्हणून कार्यरत आहेत.

सध्या उत्तर प्रदेश, गोवा, पंजाबसह उत्तराखंडमध्येही विधानसभा निवडणुकीचे वारे वाहतायेत. उत्तराखंडमध्ये २० फेब्रुवारीला मतदान होणार आहे.

यावेळी उत्तराखंडमध्ये भाजपच्या प्रचारासाठी आलेल्या हिमंता बिस्वा सरमा यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली. मात्र, राजीव गांधी यांच्या उल्लेखानं केलेल्या टीकेवरून, त्यांच्या टीकेच्या पातळीबाबत सोशल मीडियावर चर्चा होतेय.

सोशल मीडियावरून अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांनी हिमंता बिस्वा सरमा यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केलीय.

ISWOTY

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)