पश्चिम बंगालमध्ये गुवाहटी-बिकानेर एक्स्प्रेसला अपघात, 3 जणांचा मृत्यू, अनेक जखमी

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

पश्चिम बंगालमध्ये गुवाहटी-बिकानेर एक्स्प्रेस दोमोहानीजवळ रुळावरून खाली घसरली आहे. यात तीन जणांचा मृत्यू झाला आहे.

जलपाईगुडी जिल्ह्यात हा अपघाट झाला आहे. जिल्हा दंडाधिकारी मौमिता दास यांनी तीन जणांचा मृतदेह मिळाल्याचं सांगितलं आहे. तसंच अनेक जण जखमी असल्याची माहिती आहे.

रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, संध्याकाळी पाच वाजता हा अपघात झाला. या अपघातात 12 बोगींचं नुकसान झाल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही याबाबत ट्वीटवरून माहिती दिली आहे. त्या म्हणाल्या, "ही दु:खद घटना आहे. राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी, उत्तर बंगालचे DM/SP/IG घटनास्थळी लक्ष ठेवून आहेत. रेस्क्यू ऑपरेशन आणि मदत कार्य सुरू आहे. जखमींना शक्य तितक्या लवकर वैद्यकीय उपचार दिले जातील."

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांना अपघाताच्या रेस्क्यू ऑपरेशनबाबत माहिती दिली असल्याचं आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

ते पुढे लिहिलातात, "या दुर्देवी अपघातात गुवाहटी-बिकानेर एक्सप्रेसच्या 12 बोगी प्रभावित झाल्या आहेत. मी स्वत: रेस्क्यू ऑपरेशनकडे लक्ष देत आहे."

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही याबाबत ट्वीट केलं आहे. ते म्हणाले, "रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून पश्चिम बंगाल येथील घटनेची सर्व माहिती घेतली आहे. माझे विचार शोकाकुल कुटुंबांसोबत आहेत. जमखी लवकर बरे व्हावेत."

डीआरएम आणि एडीआरएम अधिकारी घटनास्थळी पोहचल्याचही रेल्वेकडून सांगण्यात येत आहे. मदतकार्यासाठी रेल्वे आणि वैद्यकीय वॅन सुद्धा पोहचली आहे.

वृत्तांनुसार, जखमींना उपचारासाठी जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. घटनास्थळी मदतकार्य सुरू आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, गुवाहटी-बिकानेर एक्सप्रेस 15633 (UP) आज (13 जानेवारी) संध्याकाळी 5 वाजता रेल्वे रुळावरून खाली घसरली.

एका प्रवाशाने दावा केला की, "अचानक अनेक बोगी उलटल्या. अनेक प्रवासी जखमी झाले आहेत."

रेल्वेने या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. रेल्वेने जारी केलेले हेल्पलाईन नंबर्स आहेत - 03612731622 आणि 03612731623

पटना जंक्शन- 9341506016

पं. दिन दयाल उपाध्याय जंक्शन- 7388898100

दानापूर - 7759070004

सोनपूर- 9771429999

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)