IndVsSA : के. एल. राहुलची एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदी निवड, रोहित शर्मा दुखापतीमुळे बाहेर

लोकेश राहुल

फोटो स्रोत, Getty Images

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी सलामीवीर फलंदाज के. एल. राहुल याची कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे.

बीसीसीआयने आज (31 डिसेंबर) ट्विट करून याबाबतची माहिती सर्वांना दिली.

रोहित शर्मा दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर झाल्यामुळे त्याच्याऐवजी के. एल. राहुलची कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आल्याचं बीसीसीआयने सांगितलं.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

सध्या भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान तीन सामन्यांची कसोटी मालिका सुरू असून या मालिकेत के. एल. राहुलला रोहित शर्माच्याच ठिकाणी उपकर्णधारपदाची भूमिका बजावावी लागत आहे.

माजी कर्णधार विराट कोहलीने ट्वेंटी-20 विश्वचषक स्पर्धेपूर्वी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर पांढऱ्या चेंडूंनी खेळवल्या जाणाऱ्या दोन फॉरमॅटसाठी वेगवेगळा कर्णधार नको म्हणून विराट कोहलीकडून वनडे कर्णधारपदही काढून घेण्यात आलं होतं.

के. एल. राहुल

फोटो स्रोत, Getty Images

विराटऐवजी रोहित शर्माची वनडे आणि ट्वेंटी ट्वेंटी कर्णधारपदी नेमणूक करण्यात आली होती. पण दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी रवाना होण्याआधी सरावादरम्यान रोहित शर्मा जखमी झाला.

दुखापतीमुळे रोहित शर्मा सुरुवातीला कसोटी मालिकेतून तर आता वनडे मालिकेतूनही बाहेर झाला आहे.

यामुळे आता के. एल. राहुलची भारतीय एकदिवसीय क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे.

राहुलने 36 टेस्ट, 35 वनडे आणि 45 ट्वेन्टी-20 सामन्यात भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे.

36 टेस्टमध्ये राहुलने 34.58च्या सरासरीने 2006 रन्स केल्या असून यामध्ये 5 शतकं आणि 11 अर्धशतकांचा समावेश आहे.

कोणत्याही क्रमांकावर बॅटिंग करण्याची क्षमता असलेला राहुल विकेटकीपिंगही करत असल्याने त्याची उपयुक्तता जास्त आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)