शेतकरी आंदोलन तब्बल 378 दिवसांनंतर स्थगित, पण सरकारला दिला 'हा' इशारा

फोटो स्रोत, Ani
दिल्लीच्या सीमांवर गेल्या वर्षभरापासून अधिक काळ सुरू असलेलं आंदोलन स्थगित करण्याची घोषणा शेतकरी नेत्यांनी केली आहे.
11 डिसेंबरपासून घराकडे परत जाऊ आणि 15 जानेवारी रोजी पुन्हा एकदा परिस्थितीची समीक्षा करू, असं शेतकरी नेत्यांनी म्हटलं आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
केंद्र सरकारनं आश्वासनं पूर्ण केली नाहीत, तर पुन्हा आंदोलन करू, असंही शेतकरी नेत्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.
गेल्या महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी वादग्रस्त कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली होती.
पण, शेतकरी नेत्यांनी एमएसपीचा कायदा आणि गुन्हे मागे घेण्याची मागणी केली आहे.
11 डिसेंबरपासून शेतकरी आंदोलनाचं ठिकाण मोकळं करायला सुरुवात करतील, असं शेतकरी नेते दर्शन पाल सिंग यांनी म्हटलं आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये चर्चा सुरू होती. केंद्र सरकारच्या प्रस्तावानंतर संयुक्त किसान मोर्चानं आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.
दोन दिवसांपूर्वी केंद्र सरकारच्या प्रस्तावानंतर संयुक्त किसान मोर्चानं स्पष्टीकरण मागितलं होतं.
त्यानंतर पुन्हा एकदा चर्चा झाली आणि आज (9 डिसेंबर) केंद्र सरकारकडून आलेल्या नव्या पत्रानंतर आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
(ही बातमी सतत अपडेट होत आहे.)
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)