संजय राऊत: प्रियंका गांधी भेटी आधी राऊतांचे विधान, 'देशभरात एकच आघाडी हवी'

फोटो स्रोत, Getty Images
"मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही सांगितलं आहे, की मोठी आघाडी उभी राहायला हवी. युपीए बळकट व्हायला हवं. चांगल्या भावनेतून त्यांनी हे म्हटलं आहे."
राजधानी दिल्लीत संजय राऊत यांनी मंगळवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली. बुधवारी ते पहिल्यांदाच प्रियंका गांधी यांना भेटणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर ते पत्रकारांशी बोलत होते.
प्रियंका यांच्या भेटीविषयी विचारलं असता ते म्हणाले, "प्रियंका गांधी निर्णयप्रक्रियेत सहभागी असतात. गांधी कुटुंबीयांपैकी महत्त्वाच्या घटक आहेत. त्यांना एखाद्या विषयावर चर्चा करायची असेल तर आमचं कर्तव्य आहे की चर्चा करावी."
"देशभरात एकच आघाडी असायला हवी असं शिवसेनेला वाटतं. मी वेळोवेळी हीच भूमिका मांडत आलो आहे. पवारसाहेबांनाही असंच वाटतं.
विरोधकांची मोट बांधताना गटतट असता कामा नयेत. शरद पवार यांच्या उंचीचा नेता देशाच्या राजकारणात आज नाही. आजही देशातले राजकीय पक्ष पवार साहेबांना मान देतात. त्यांचा शब्द ऐकला जातो. ते आमच्या सगळ्यांसाठी महत्त्वाचं. काल राहुल गांधींशी झालेल्या चर्चेतही हा विषय आला. राजकीय चर्चेदरम्यान अनेक विषयांवर चर्चा झाली".
"चंद्रकांत पाटील यांचं फलटणमधलं वक्तव्य गांभीर्याने घेण्याची आवश्यकता नाही. त्यांची विधानं नैराश्यातून, वैफल्यातून आली आहेत. त्यामुळे गांभीर्याने घेण्याची गरज नाही," असा टोला राऊत यांनी हाणला.
"महाराष्ट्रात कोण कोणाला खांद्यावर घेऊन एकेकाळी वाढवत होतं हे देश जाणतो. माझ्या उत्तराने अनेकांची प्रकृती ढासळेल. म्हणून मी उत्तर देत नाही. महाराष्ट्रातल्या जनतेचं आरोग्य नीट राहायला हवं. विशेषतः विरोधी पक्षाचं आरोग्य नीट राहायला हवं. विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांसाठी प्रेरणादायी असतात," असं ते म्हणाले.
"राज्यसभेचे खासदार 12 खासदारांच्या निलंबनासंदर्भात गांधी पुतळ्याजवळ जाणार आहोत. लोकसभेतले शिवसेनेचे खासदार समर्थन देण्यासाठी गांधी पुतळ्याजवळ जातील. शिवसेनेचे दोन खासदार निलंबित आहेत," असं त्यांनी स्पष्ट केलं.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
























