राहुल गांधीः शेतकरी आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत करा

फोटो स्रोत, PTI
शेती आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांना मदत करा, अशी विनंती काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केली आहे. आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांची यादी सभागृहात सादर करत आहोत अशी माहिती त्यांनी दिली.
शून्य प्रहरात राहुल गांधी म्हणाले, "पंतप्रधानांनी सांगितले देशाची आणि शेतकऱ्यांची माफी मागतो. चूक केल्याचं त्यांनी मान्य केलं. कृषी मंत्र्यांनी आंदोलनात किती लोक मृत्युमुखी पडल्याचं हे माहिती नसल्याचं सांगितलं. पंजाब सरकारने जवळपास 400 शेतकऱ्यांना मदत केली आहे तर 152 शेतकऱ्यांना रोजगार दिला आहे. पंतप्रधानांनी जी माफी मागितली आहे. त्यांच्याकडे शेतकऱ्यांची नावे नाहीत असं ते म्हणतात. त्यांची यादी आम्ही देत आहोत. त्या लोकांना मदत आणि रोजगार मिळाला पाहिजे."
दिल्लीजवळ शेतकरी जवळपास वर्षभरापासून ज्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करत होते, ते कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती.
मात्र, असं असलं तरी इतर सर्व मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरुच ठेवणार असल्याचं शेतकऱ्यांनी म्हटलं आहे. या मागण्यांमध्ये किमान आधारभूत किंमत आणि उत्पन्नात वाढ या मुद्द्यांचा प्रामुख्यानं समावेश आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2016 मध्ये शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचं आश्वासन दिलं. नव्या कृषी कायद्यांनी ते शक्य होईल, असं सत्ताधारी भाजपच्या नेत्यांचं मत होतं.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
























