नांदेडमध्ये 1.1 टन गांजा जप्त, एनसीबीची कारवाई - समीर वानखेडे

समीर वानखेडे

फोटो स्रोत, ANI

Published
वाचन वेळ: 1 मिनिटे

नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यात नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोनं (एनसीबीनं) कारवाई करत तब्बल 1.1 टन गांजा जप्त केला आहे.

या गांजाचं बाजारमूल्य 7 कोटी रुपये असल्याचं सांगण्यात आलं आहे. एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी या कारवाईची माहिती दिली.

समीर वानखेडे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं, नांदेडमध्ये ही कारवाई करण्यात आली आहे. 1.1 टन गांजा पकडण्यात आला आहे. हा गांजा आंध्र प्रदेशमधून आणण्यात आला होता. महाराष्ट्रात हा ट्रक आल्यानंतर गांजा ताब्यात घेतला गेला.

या प्रकरणी आतापर्यंत दोन लोकांना ताब्यात घेतलं गेलंय. चौकशी सुरू आहे, असंही समीर वानखेडे यांनी म्हटलं.

काय आहे प्रकरण?

एनसीबीने एका ट्रकला थांबवून तपासणी करून तब्बल 1.1 टन गांजा जप्त केला आहे. या गांजाचे बाजारमूल्य तब्बल 7 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आलय.

एनसीबीने जप्त केलेला ट्रक

फोटो स्रोत, NCB

फोटो कॅप्शन, एनसीबीने जप्त केलेला ट्रक

आज (15 नोव्हेंबर) पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यात असलेल्या मांजरम या गावच्या रोडवर MH26-AD-2165 या ट्रकची तपासणी करण्यात आली.

या तपासणीत प्रत्येकी 20 किलो गांजा असलेली 43 पोती, तर 24 किलो गांजा असलेली 5 पोती एनसीबी पथकाला आढळून आली.

हा गांजा आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम इथून निघाला असून तो जळगाव इथं पोहोचवायचा असल्याची माहिती मिळाली आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)