Porn hubने खोट्या जाहिराती दाखवून मुलींचा सेक्स ट्रॅफिकिंगसाठी वापर केला?

पॉर्न हब

फोटो स्रोत, Getty Images

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

जवळजवळ 50 स्त्रियांनी पॉर्न हब या वेबसाईटविरुद्ध कोर्टात केस दाखल केली होती. या वेबसाईटमुळे त्यांना सेक्स ट्रॅफिकिंगला सामोरं जावं लागलं असा त्यांचा आरोप होता.

हे प्रकरण आता मिटवण्यात आल्याची माहिती या वेबसाईटची मुख्य कंपनीने दिली आहे.

Girls Do Porn या वेबसाईटवर वयस्क व्यक्तींसाठी मजकूर उपलब्ध करू दिला जातो. या वेबसाईटने या बायकांना कॅमेऱ्यासमोर लैंगिक संबंध प्रस्थापित करायला लावले आणि या क्लिपचा कसा वापर करायचा ही माहितीसुद्धा सांगितली नाही. या वेबसाईटची पॉर्न हब सोबत भागीदारी होती.

या 50 बायकांनी पॉर्न हब विरोधात खटला दाखल केला. पॉर्न हबला याबद्दल माहिती होती तरीही त्यांनी भागीदारी चालू ठेवली असा आरोप या स्त्रियांनी केला आहे.

पॉर्न हबची मुख्य कंपनी असलेल्या Mind Geek ने यासंबंधात एक निवेदन जारी केलं आहे. आमच्या वेबसाईटवर कदापि बेकायदेशीर मटेरिअल टाकणार नाही असं या निवेदनात म्हटलं आहे.

"दोन्ही बाजूंनी मिळून या प्रकरणावर तोडगा काढला आहे. मात्र यामगच्या अटी गुप्त ठेवण्यात आल्या आहेत." असं या कंपनीचे वकील ब्रायन होलम यांनी सांगितलं.

Girls Do Porn आणि Mind Geek या कंपन्यांची ऑक्टोबर 2019 पर्यंत भागीदारी होती. जेव्हा अमेरिकेच्या कायदा व सुव्यवस्था विभागाने ही कंपनी बंद पाडली. कंपनीच्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांना अटक केली आणि त्यांच्यावर सेक्स ट्रॅफिकिंगचे आरोप ठेवण्यात आले.

या कंपनीने पॉर्नहब आणि अनेक सार्वजनिक वेबसाईटवर अनेक अश्लील व्हीडिओ अपलोड केले होते. Girls Do Porn या कंपनीवर कायदेशीर कारवाई केल्यावर पॉर्न हबने व्हीडिओ काढून टाकले.

मॉडेलिंगची जाहिरात दिसते पण...

Girls Do Porn ही कंपनी मॉडेलिंगच्या जाहिराती करत असल्याचं सांगितलं जातं. ज्या मुली या जाहिरातीला बळी पडल्या त्यांना पॉर्नोग्राफिक व्हीडिओ करण्यास सांगण्यात आलं. हे व्हीडिओ गुप्त ठेवण्यात येतील असं त्यांना सांगण्यात आलं.

हे व्हीडिओ एका डीव्हीडीसाठी तयार करण्यात आले आहेत असंही सांगण्यात आलं. मात्र नंतर हे व्हीडिओ सार्वजनिक करण्यात आले असा आरोप अमेरिकेतल्या सरकारी वकिलांनी केला आहे.

या स्त्रियांनी व्हीडिओचा गैरवापर करण्यात आल्याची तक्रार Mind Geek कडे केली होती, तरी त्यांनी भागीदारी कायम ठेवली असं या आरोपपत्रात म्हटलं. जून 2016 मध्ये पहिल्यांदा खटला दाखल करण्यात आला होता. "MindGeek बेकायदेशीर मटेरिअल वेबसाईटवर प्रकाशित करण्याच्या पूर्णपणे विरोधात आहे, असं मटेरिअल आमच्या वेबसाईटवर येऊ नये यासाठी आमच्याकडे मार्गदर्शक तत्त्वं आहेत" असं या निवेदनात म्हटलं आहे.

हा खटला आधी 40 बायकांनी दाखल केला होता. आता ही संख्या 50 इतकी झाली आहे.

पॉर्न हब

फोटो स्रोत, Getty Images

Girls Do Porn या कंपनीच्या अनेक लोकांना या प्रकरणात शिक्षा झाली आहे. त्यांना नोव्हेंबर महिन्यात 20 वर्षांची कैद सुनावण्यात आली आहे.

"या कंपनीने मॉडेलिंगच्या खोट्या जाहिराती दाखवून अनेक मुलींना आणि स्त्रियांना सेक्सचे व्हीडिओ करण्यास भरीस पाडलं." असा युक्तिवाद अमेरिकेतल्या सरकारी वकिलांनी कोर्टात केला.

Girls Do Porn चे सहसंस्थापक मायकेल प्रॅट यांना अटक करण्याच्या हालचाली करत आहेत. त्याच्यावर 50 हजार डॉलर्सचं बक्षीस ठेवण्यात आलं आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)