काश्मीरमध्ये परप्रांतीयांवर हल्ले का होत आहेत?

काश्मीरमधून पलायन करणारे परप्रांतीय मजूर

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, काश्मीरमधून पलायन करणारे परप्रांतीय मजूर
Published
वाचन वेळ: 4 मिनिटे

काश्मीरमध्ये गेल्या काही काळामध्ये सर्वसामान्यांवर होणाऱ्या हल्ल्यांचं प्रमाण वाढलेलं आहे.

श्रीनगरच्या ईदगाह भागात पाणीपुरी विकणाऱ्या अरविंद साह यांची कथित कट्टरतावाद्यांनी गोळ्या घालून हत्या केली. ते गेली 17 वर्षं हे काम करत होते.

या हल्ल्याच्या दुसऱ्याच दिवशी 17 ऑक्टोबरला कट्टरवाद्यांनी कुलगाममध्ये दोघांची हत्या केली. हे दोघेही बिहारचे होते.

ऑक्टोबरच्या सुरुवातीपासून काश्मीर खोऱ्यामध्ये सामान्यांवरच्या अशा हल्ल्यांचं सत्र सुरू आहे. आत्तापर्यंत या हत्यासत्रात 5 जणांना आपला जीव गमवावा लागलाय.

5 ऑक्टोबरला रात्री उशिरा हातात पिस्तूल घेऊन आलेल्या हल्लेखोरांनी बिंदरू 'हेल्थ झोन'चे मालक माखनलाल बिंदरू यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या होत्या.

या घटनेनंतर दोनच दिवसात हल्लेखोरांनी श्रीनगरमधल्या बाहरी संगम भागातल्या सरकारी शाळेवर हल्ला केला. त्यांनी एकेकाला ओळख विचारली आणि शाळेचे मुख्याध्यापक आणि एका शिक्षकाची हत्या केली.

काश्मीरमधली सध्याची परिस्थिती काय?

रोजगारासाठी काश्मीर खोऱ्यात आलेले अनेक स्थलांतरित कामगार सध्या काश्मीर सोडून परत जात आहेत. 2021 वर्षामध्ये कट्टरतावाद्यांनी काश्मिरमध्ये आतापर्यंत 28 सिव्हिलियन्स म्हणजेच सामान्य नागरिकांची हत्या केलीय.

ऑक्टोबर महिन्यात सामान्यांवरच्या या हल्ल्यांमध्ये वाढ झाली आणि यात परप्रांतीयांवरही हल्ले करण्यात आले.

या तथाकथित दहशतवाद्यांनी सुरुवातीला ज्या लोकांना मारलं ते काश्मीरमधले अल्पसंख्याक होते. श्रीनगरमधले काश्मिरी पंडित केमिस्ट माखनलाल बिंद्रू, एका सरकारी शाळेच्या शीख मुख्याध्यापिका सुपिंदर कौर आणि शिक्षक दीपक चंद.

यानंतर रोजगारासाठी बाहेरच्या राज्यांतून काश्मीर खोऱ्यात आलेल्यांवर हल्ले करण्यात आले. यामुळे काश्मीरमध्ये दहशतीचं वातावरण आहे.

या हल्ल्यांनंतर काश्मीर खोऱ्यात एक मेसेज पसरला. यात लिहिलं होतं की सुरक्षेच्या कारणास्तव खोऱ्यातल्या स्थलांतरित मजूरांना पोलिसांच्या किंवा CRPF किंवा आर्मी कॅम्पमध्ये एकत्र करण्यात यावं.

अशी कोणतीही ऑर्डर आपण काढली नसून हा मेसेज फेक असल्याचं काश्मीरचे आय. जी. विजयकुमार यांनी म्हटलंय.

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

स्थलांतरित मजुरांवर हल्ले का होतायत?

या हल्ल्यांमागे पाकिस्तानचा हात असल्याचा आरोप भाजपने केलाय. पाकिस्तान आणि कट्टरवादी मिळून तणाव निर्माण करत असल्याचं भाजपच्या जम्मू काश्मीर शाखेचे प्रमुख रविंदर रैनांनी म्हटलंय.

काश्मीरमधून पलायन करणारे परप्रांतिय मजूर

फोटो स्रोत, Getty Images

एका निवेदनाद्वारे त्यांनी म्हटलंय, "पाकिस्तानी दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा अक्षम्य अपराध करत काश्मीर खोऱ्यात मेहनतीच्या जोरावर रोजीरोटी कमावणाऱ्या मजुरांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. हा अक्षम्य अपराध पाकिस्तानच्या भित्र्या दहशतवाद्यांनी केला आहे."

तर भारत-पाकिस्तानदरम्यान 24 ऑक्टोबर रोजी होणारा क्रिकेट सामना रद्द करण्यात यावा अशी मागणी बिहारचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते तारकिशोर प्रसाद यांनी केलाय.

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

हा काश्मीरला बदनाम करण्याचा डाव असल्याचं खासदार आणि नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्लांनी म्हटलंय. तर प्रशासनाची पकड सैल झाल्याने असं घडल्याचं जम्मू आणि काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी म्हटलंय.

X पोस्टवरून पुढे जा, 3
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 3

अफगाणिस्तानात तालिबान परतल्याने त्याचे परिणाम काश्मीरवर होत असल्याचा आरोप काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरींनी केलाय.

काश्मीरमधल्या मुसलमानांसाठी आवाज उठवण्याचा आपल्याला अधिकार असल्याचा दावा तालिबानचे प्रवक्ते सुहैल शाहीन यांनी काही काळापूर्वी केला होता.

काश्मीरचे आय. जी. विजयकुमार यांनी या हल्ल्यांविषयी बोलताना सांगितलं, "आमच्या कारवायांमध्ये मोठ्या प्रमाणावर दहशतवादी मारले गेले. यामुळे त्यांची यंत्रणा काहीशी ढासळलेली आहे. वैतागलेल्या टेररिस्ट हँडलर्सनी आपली स्ट्रॅटेजी बदलली आणि निशस्त्र पोलीस, राजकारणी, अल्पसंख्याक समाजातले सामान्य नागरिक आणि महिलांवर हल्ले करायला सुरुवात केली. या सगळ्या हल्ल्यांमध्ये पिस्तुलाचा वापर करण्यात आलाय. नव्याने दहशतवादी झालेल्या किंवा दहशतवादी संघटनेत पद मिळालेल्या व्यक्तींनी केलेले हे हल्ले आहेत."

हल्ले कोणी केले?

काश्मीरमधलं कलम 370 हटवण्यात आल्यानंतर TRF हा एक नवीन गट इथे सक्रिय झालाय. TRF म्हणजे The Resistance Front.

ऑगस्ट 2019 मध्ये कलम 370 बरखास्त करण्यात आलेला हा गट आहे आणि सामान्य नागरिकांवर यापूर्वी झालेल्या हल्ल्यांची जबाबदारी याच गटाने घेतली होती. गेल्या काही दिवसांमध्ये काश्मीर खोऱ्यात झालेल्या हल्ल्यांशीही याच गटाचा संबंध असल्याचं म्हटलं जातंय.

काश्मीरमधून पलायन करणारे परप्रांतिय मजूर

फोटो स्रोत, Getty Images

स्थलांतरित मजुरांवर हल्ला करण्यामागचं कारण काय असावं, हे सांगताना टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसचे पाटण्यातले संचालक पुष्पेंद्र म्हणाले, "दोन गोष्टी आहेत. पहिली म्हणजे कलम 370 हटवल्यानंतर शांतता प्रस्थापित झाल्याचा सरकारने केलेला दावा पोकळ असल्याचं यावरून सिद्ध होतं.

"दुसरं म्हणजे सगळ्यांत कमकुवत व्यक्तीला टार्गेट करणं हे दहशतवाद्यांसाठी कायमच सोपं असतं. कोणत्याही ठिकाणी सर्वांत दुर्बल असतो तो तिथे स्थलांतर करून आलेला कामगार. जर तुम्ही एखाद्या स्थानिकाची हत्या केली तर ती बातमी स्थानिक माध्यमांपुरतीच मर्यादित राहते. पण जर तुम्ही दुसऱ्या कोणत्या राज्यातल्या व्यक्तीला मारलंत, तर त्याचा मोठा परिणाम होतो," पुष्पेंद्र सांगतात.

या घडामोडींमुळे सध्या तरी काश्मीर खोऱ्यातून स्थलांतरित मजूर बाहेर पडतायत. ज्यांनी थांबायचा निर्णय घेतलाय, त्यांच्या मनात भीती आहे. काश्मीरमधली स्थिती सुरळीत करायचं असेल तर त्यासाठी अल्पसंख्याक आणि स्थलांतरितांच्या मनातली भीती काढून टाकणं गरजेचं असल्याचं विविध पक्षांनी म्हटलं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)