काश्मिरमधील कुलगाम जिल्ह्यात दोन बिगर काश्मिरी व्यक्तींची हत्या

फोटो स्रोत, ANI
काश्मीरच्या कुलमागमध्ये रविवारी दोन बिगर काश्मिरी नागरिकांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली.
जवळपास गेल्या दीड महिन्यात याठिकाणी काश्मीरचे नसलेल्या पाच जणांची हत्या करण्यात आली आहे.
यापूर्वी काश्मिरी शीख महिला शिक्षिका सुपिंदर कौर, जम्मूतील राहणारे दीपक चंद आणि बिहारचे वीरेंद्र पासवान तसंच आणखी एक काश्मीरी पंडित फार्मासिस्ट एमएल बिंदरु यांची हत्या करण्यात आली होती.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
दरम्यान, जम्मूच्या कठुआ जिल्ह्यात विमान दुर्घटनाग्रस्त झाल्यानं भारतीय हवाई दलाच्या 2 पायलटचा मृत्यू झाला आहे, तर जम्मूची सीमा असलेल्या पूंछ जिल्ह्यात राबवलेल्या ऑपरेशनमध्ये 9 भारतीय सैनिकांचा मृत्यूदेखील झाला आहे.
5 ऑक्टोबरला रात्री उशिरा हातात पिस्तूल घेऊन आलेल्या हल्लेखोरांनी बिंदरू 'हेल्थ झोन'चे मालक माखनलाल बिंदरू यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या होत्या. दुकानाच्या सेल्समनने सांगितलं की ते फोनवर बोलत होते तेवढ्यात हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या आणि नंतर अंधारात पळून गेले.
68 वर्षीय बिंदरू हे काश्मीरमधील प्रसिद्ध डॉक्टर आणि फार्मासिस्ट राकेश्वर नाथ यांचे चिरंजीव होते.
आरएन बिंदरू यांचा संपूर्ण काश्मीरात आणि विशेषत: श्रीनगरमध्ये फार्मसीचा मोठा कारभार होता. बिंदरू मेडिकेट नावाच्या त्यांच्या दुकानात अन्यत्र मिळत नाहीत अशी औषधंही मिळायची.

या घटनेनंतर दोनच दिवसात हल्लेखोरांनी श्रीनगरमधल्या बाहरी संगम भागातल्या सरकारी शाळेवर हल्ला केला. त्यांनी एकेकाला ओळख विचारली आणि शाळेचे मुख्याध्यापक आणि एका शिक्षकाची हत्या केली.
सुपिंदर कौर काश्मीरी शीख समाजाच्या होत्या. सुपिंदर यांना दोन मुलं आहेत. त्या अलुचा बाग परिसरात राहायच्या. दीपक चंद त्याच शाळेत शिक्षक होते. ते जम्मूला राहायचे.
पोलीस आणि प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, तीन हत्यारबंद हल्लेखोर शाळेत शिरले आणि ते प्रत्येकाला नाव विचारू लागले. हल्लेखोरांनी सुपिंदर आणि दीपक यांना बाजूला केलं आणि त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. दोघांचाही जागीच मृत्यू झाला.
परिस्थिती सर्वसामान्य झाल्याचा सरकारी दावा फोल?
ऑक्टोबरच्या सुरुवातीला सात लोकांच्या हत्येनंतर सगळं काही सुरळीत झालं आहे आणि शांतता आहे या सरकारी दाव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
सरकारी अभियान सुरू असतानाच या हत्या झाल्या आहेत. काश्मीरला लागू असलेलं कलम 370 हटवण्यात आल्याचे फायदे काय आहेत हे केंद्र सरकारमधील 70हून अधिक मंत्री सांगण्यासाठी राज्याचा दौरा करत असताना हे हत्याकांड घडलं आहे.

फोटो स्रोत, ANI
5 ऑगस्ट 2019 नंतर शेकडो लोकांना अटक करण्यात आली होती. दळवळणाची अनेक साधनं बंद करण्यात आली होती. यामध्ये इंटरनेटचा समावेश होता. अनेक शहरं आठवडा आठवडा बंद होती. राज्याच्या तीन माजी मुख्यमंत्र्यांनी कलम 370 रद्द करण्याच्या निर्णयाचा निषेध केला नाही.
हत्याकांडाचा राज्यातील नेत्यांनी निषेध केला आहे. 1990च्या दशकात जशी परिस्थिती होती तशी निर्माण झाली आहे. परिस्थिती पूर्ववत आणि शांततापूर्ण आहे हा सरकारी दावा फोल ठरला आहे असं काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांनी म्हटलं आहे.
दोन दशकात पहिल्यांदाच अल्पसंख्याक झाले लक्ष्य
एमएल बिंदरू आणि सुपिंदर कौर यांच्या हत्या म्हणजे 18 वर्षानंतर काश्मिरी पंडित किंवा शीख समाजाच्या नागरिकांवर झालेला हल्ला आहे.
मार्च 2000 मध्ये अनंतनाग जिल्ह्यात चिट्टीसिंह पुरा गावात हल्लेखोरांनी शीख समाजाच्या 35 लोकांना मारलं होतं. 2003 मध्ये पुलवामा इथे सुदूर गावात 20 हून अधिक काश्मिरी पंडितांची हत्या करण्यात आली होती.
काश्मीरमध्ये धार्मिक तणाव वाढल्याच्या काश्मीर पोलीस प्रमुख विजय कुमार यांनी खंडन केलं होतं. कट्टरतावाद्यांनी ज्या लोकांची हत्या केली त्यामध्ये बहुतांश मुसलमान आहेत असं त्यांनी म्हटलं होतं.
2021 मध्ये कट्टरतावाद्यांच्या हल्लात 28 नागरिक मारले गेले आहेत. यापैकी 5 स्थानिक हिंदू आणि 2 शीख आहेत. 2 बाहेरून आलेले कामगार होते.
गेल्या काही दिवसात झालेल्या हत्या म्हणजे धार्मिक तेढ पसरवण्याचा प्रयत्न आहे असं जम्मू काश्मीर पोलीस महासंचालक दिलबाग सिंह यांनी सांगितलं होतं.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
























