रावण-सीतेच्या प्रेमसंवादामुळे 'भवई'चा ट्रेलर वादाच्या भोवऱ्यात, निर्मात्यांनी काय म्हटलं?

भवई, प्रतीक गांधी, रावण, राम, हिंदू, चित्रपट, संस्कृती

फोटो स्रोत, T - SERIES/YT GRAB

फोटो कॅप्शन, भवई चित्रपटातलं दृश्य
Published
वाचन वेळ: 4 मिनिटे

स्कॅम वेब सीरिज मधील प्रसिद्ध अभिनेता प्रतीक गांधी याचा 'भवई' चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

चित्रपटाचं आधीचं नाव 'रावणलीला' होतं. विरोधानंतर ते बदलून 'भवई' करण्यात आलं. मात्र तरीही अनेकांनी चित्रपटाच्या ट्रेलरवर आक्षेप नोंदवला.

सोशल मीडियावर आरोप करताना लोकांचं म्हणणं असं आहे की, चित्रपटात रावणाचं उदात्तीकरण करण्यात आलं आहे.

एका गटाचं म्हणणं असं आहे की चित्रपटात रामाचा अपमान करण्यात आला आहे. हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्यात आल्याचंही काहींचं म्हणणं आहे.

रविवारी (19 सप्टेंबर) ट्वीटरवर #arrestpratikgandhi और #BanRavanleela_Bhavani या गोष्टी ट्रेंडर करत होत्या.

या चित्रपटाची पार्श्वभूमी गुजरातची आहे. एका गावात रामलीलेचं आयोजन करण्यात आलं आहे. हार्दिक गज्जर यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून, त्यांचा हा पहिलाच चित्रपट आहे.

ट्रेलरमध्ये प्रतीक रामलीलेत रावणाच्या भूमिकेत असल्याचं दिसतं. रामलीलेत सीतेची भूमिका करणाऱ्या पात्राच्या प्रेमात ते पात्र पडल्याचं दिसत आहे.

संवाद आणि चित्रणाला विरोध

रावण तसंच हिंदू देवदेवतांच्या संवाद आणि चित्रणासंदर्भात अनेक आक्षेप नोंदवण्यात आले आहेत.

भवई, प्रतीक गांधी, रावण, राम, हिंदू, चित्रपट, संस्कृती

फोटो स्रोत, T- SERIES/YT GRAB

फोटो कॅप्शन, भवई चित्रपटातील एक दृश्य

ट्रेलरमध्ये रावणाच्या भूमिकेत असलेला प्रतीक रामाच्या भूमिकेत असलेल्या पात्राशी बोलताना दिसतो. रावण रामाला म्हणतो, "तू माझ्या बहिणीचा अनादर केला आहेस आणि मी तुझ्या स्त्रीचा. मात्र तुम्ही लोकांनी माझ्या बहिणीचं नाक कापलं. तरीही तुमचा जयजयकार होतो".

याला उत्तर देताना रामाचं पात्र निभावणारा कलाकार म्हणतो, "कारण मी देव आहे."

ट्रेलरच्या एका अन्य दृश्यात रावणाच्या भूमिकेतील प्रतीक गांधी सीतेचं पात्र रंगवणाऱ्या कलाकाराला म्हणतो, "आपल्या दोघांमध्ये काहीतरी सुरू आहे".

हिंदू संस्कृतीचं चुकीच्या पद्धतीने चित्रणाचा आरोप

ट्रेलरवरून सोशल मीडियावर एका मोठ्या वर्गाने टीका केली आहे. धर्म आणि सत्य याचं प्रतीक म्हणजे राम. ट्रेलरमध्ये मात्र रावणाचं कृत्य योग्य ठरवण्यात आल्याचं अनेक लोकांचं म्हणणं आहे. हा हिंदू देवतांचा अपमान असल्याचं लोकांचं म्हणणं आहे.

भवई, प्रतीक गांधी, रावण, राम, हिंदू, चित्रपट, संस्कृती

फोटो स्रोत, T-SERIES/YT GRAB

फोटो कॅप्शन, प्रतीक गांधी रावणाच्या भूमिकेत आहे.

बॉलीवूड चित्रपटांमध्ये हिंदू संस्कृतीचं चुकीचं चित्रण दाखवलं जातं असा अनेकांचा आरोप आहे.

विरोध करणाऱ्या अनेकांनी अश्लाघ्य भाषेत टीका केली आहे. एकाच मजकुराचे ट्वीट लक्षात घेता टीकेसाठी फेक अकाऊंटचा वापर केला जात असल्याचं लक्षात आलं आहे.

चित्रपटाचं नाव बदलण्यावरून प्रतीकनं काय म्हटलं होतं?

प्रतीकने काही दिवसांपूर्वीच चित्रपटाचं नाव बदललं आहे याची घोषणा केली.

इन्स्टाग्रामवर नवं पोस्टर शेअर करताना प्रतीकने लिहिलं की, "मी ज्या गोष्टीचा भाग होतो ते चाहत्यांच्या मनात स्थान पटकावण्याची संधी आहे. कोणाच्याही भावना दुखावण्याचा हा प्रयत्न नाही".

Instagram पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

Instagram पोस्ट समाप्त

"आम्ही एक टीम म्हणून निर्णय घेतला आहे की आमच्या चित्रपटाचं नाव 'भवई' असणार आहे. यावरही अनेकांनी टीका केली आहे. केवळ नाव बदलून आणि ट्रेलरमधील काही दृश्यं हटवून यावरचा उपाय नाही".

दुसरीकडे अनेकांनी चित्रपटाच्या ट्रेलरचं कौतुक केलं आहे.

निर्मात्यांनी काय स्पष्टीकरण दिलं?

या सगळ्या वादावर चित्रपटाच्या निर्मात्यांनी एक प्रसिद्धीपत्रक काढून आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

चित्रपटाचं 'रावणलीला'हे नाव बदलण्यात आल्याचं निर्मात्यांनी स्पष्ट केलं आहे. त्याचप्रमाणे त्यांनी प्रोमोमधील ज्या संवादावर आक्षेप घेतला जात आहे, तो चित्रपटात नसेल असं आश्वासनही दिलं आहे.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

भवई ही राजा राम जोशी (प्रतीक गांधी) आणि राणी (इंद्रिता रे) या दोन व्यक्तिरेखांची काल्पनिक गोष्ट आहे. ते दोघंही एका नाटक कंपनीत काम करत असतात आणि स्टेजवर त्यांचं संपूर्ण आयुष्य कसं बदलतं याची ही गोष्ट आहे. मुख्य पात्र हे नाटकात रावणाची भूमिका करत असल्यानं चित्रपटाचं आधीचं नाव हे 'रावणलीला' होतं.

आम्ही हिंदू संस्कृती आणि रामायणाचा आदर करतो. त्यामुळे कोणाच्याही धार्मिक भावना किंवा श्रद्धा आम्ही दुखवणार नाही.

नाव बदलून काय साधणार?

प्रतीकने या चित्रपटाच्यासंदर्भात पीटीआयशी बोलताना सांगितलं की, "या चित्रपटात आम्ही राम किंवा रावण यांच्याबद्दल बोलत नाहीयोत. चित्रपट याविषयी नाहीये. आम्ही विचार केला, समाजातील अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर आम्हाला चित्रपटाचं नाव बदलायला काही हरकत नाही".

"व्यापक प्रश्नाचं उत्तर 'नाही' असं आहे. आम्ही नाव बदललं आहे, पण त्याने त्याने खरंच काही बदलेल का? चित्रपट आणि खरं जग यातला फरक चाहत्यांनी समजून घ्यावा", असं प्रतीकने म्हटलं आहे.

भवई, प्रतीक गांधी, रावण, राम, हिंदू, चित्रपट, संस्कृती

फोटो स्रोत, T-SERIES/YT GRAB

फोटो कॅप्शन, ट्रेलरमधील एक दृश्य

"हनुमानजी यांचं पात्र साकारल्यानंतर त्या कलाकाराचं लग्न होत नाही असं होतं का? लेखकाने लिहिलेली गोष्ट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं हे कलाकारांचं काम असतं. कलाकारांचं एक वैयक्तिक आयुष्य असतं. प्रेक्षक हे विसरू लागतात तेव्हा अडचणी निर्माण होतात. हीच या चित्रपटाची कहाणी आहे," असं प्रतीकने म्हटलं आहे.

हा चित्रपट चांगलं प्रदर्शन करेल, असं दिग्दर्शक गज्जर यांनी सांगितलं होतं.

त्यांनी एक वक्तव्य जारी करून म्हटलं की, "चाहत्यांनी प्रतीकला प्रचंड प्रेम दिलं आहे. या चित्रपटाच्या प्रेमातून हे प्रेम वाढेल अशी आशा आहे. हा चित्रपट आमच्या मनाच्या अतिशय जवळचा आहे. हा चित्रपट प्रेक्षकांचं मन जिंकेल".

हंसल मेहता यांच्या 'स्कॅम 1992' या वेबसीरिजने प्रतीक घराघरात पोहोचला होता. वेबसीरिजचं आणि प्रतीक यांच्या अभिनयाचं कौतुक झालं होतं.

याआधीचे वादविवाद

संजय लीला भन्साळी यांच्या रामलीला चित्रपटाच्या नावावरूनही वाद निर्माण झाला होता. विरोधामुळे या चित्रपटाचं नाव 'गोलियों की रासलीला-रामलीला' असं नामकरण करण्यात आलं. दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह यांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका केली होती.

संजय लीला भन्साळी यांच्या 'पद्मावत' चित्रपटासंदर्भातही खूप वाद झाला होता. त्यावेळी हिंसाचारही झाला होता. चित्रपटाचं नाव 'पद्मावती' होतं, ते बदलावं लागलं.

भवई, प्रतीक गांधी, रावण, राम, हिंदू, चित्रपट, संस्कृती

फोटो स्रोत, VIACOM18MOTIONPICTURES

फोटो कॅप्शन, पद्मावत चित्रपटावेळीही वाद झाला होता.

चित्रपटात पद्मावती आणि अल्लाउद्दीन खिलजी यांच्यातील काही दृश्यांवरून वाद निर्माण झाला होता. ही दृश्यं नंतर चित्रपटातून वगळण्यात आली.

'घूमर' नावाच्या गाण्यात राणी पद्मावतीचं पात्र साकारणाऱ्या दीपिका पदुकोणची कंबर दिसत असल्यावरून वाद निर्माण झाला होता. स्पेशल इफेक्ट्सच्या माध्यमातून कंबर झाकून टाकण्यात आली.

या चित्रपटाला असलेला विरोध एवढा टोकाला गेला की, चित्रपट प्रदर्शित होण्याआधी संजय लीला भन्साळी यांना वृत्तपत्रात पानभर जाहिरात देऊन हा चित्रपट कुणाच्याही भावना दुखावणारा नाही असं सांगावं लागलं.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)