बाबुल सुप्रियो यांचा तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश

फोटो स्रोत, @AITCofficial
भाजप नेते बाबुल सुप्रियो यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. तृणमूल काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ही माहिती देण्यात आली आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
जुलै महिन्यात मोदी सरकारनं मंत्रिमंडळ विस्तार केला होता. यावेळी इतर अनेक मंत्र्यांप्रमाणे पश्चिम बंगालचे बाबुल सुप्रियो यांनासुद्धा मंत्रीपदावरून काढून टाकण्यात आलं. पश्चिम बंगालमधील पक्षाच्या खराब कामगिरीमुळे ही कारवाई झाल्याचं मानलं गेलं.
ज्येष्ठ पत्रकार प्रदीप सिंह यांच्या मते, "बाबुल सुप्रियो यांना पश्चिम बंगालमधील निकालांची किंमत मोजावी लागली. शिवाय, ते स्टार असल्याप्रमाणे वागत होते, परंतु मंत्र्यांनी असं वागणं अपेक्षित नव्हतं."
मंत्रिमंडळातून काढून टाकल्यानंतर सुप्रियो यांनी खासदारकीचा राजीमाना दिला होता, तसंच आपण राजकीय संन्यास घेत असल्याचं जाहीर केलं होतं.
जुलै महिन्यात फेसबुक पोस्टद्वारे सुप्रियो यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.
काय म्हणाले होते सुप्रियो?
लवकरच लोकसभेच्या खासदारकीचा राजीनामा देईन आणि सरकारी निवासस्थान सोडेन असं सुप्रियो यांनी म्हटलं होतं.
त्यांनी लिहिलं होतं- "येतो, निरोप घेतो. आईवडील, पत्नी, मित्रपरिवार यांच्याशी चर्चा करून राजकारणातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतो आहे".
अन्य कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश करणार नाही असं सुप्रिया यांनी त्यावेळी म्हटलं होतं. मात्र आता त्यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
सुप्रियो यांनी पश्चिम बंगालमधल्या आसनसोल मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि दोनदा जिंकून आले. 7 जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार जाहीर करण्यात आला. केंद्रीय मंत्री असणाऱ्या सुप्रियो यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला होता.
"खूप दिवस थांबलो. मी कुणाला मदत केली, कुणाला निराश केलं याचा निर्णय जनतेने करायचा आहे. सामाजिक काम करण्यासाठी राजकारणात राहण्याची आवश्यकता नाही", असं सुप्रियो तेव्हा म्हणाले होते.

फोटो स्रोत, @AITCofficial
पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपने त्यांना उमेदवारी दिली होती. तृणमूलच्या अरुप बिस्वास यांनी सुप्रियो यांच्यावर 50 हजारांच्या फरकाने विजय मिळवला होता.
2014 मध्ये लोकसभा खासदार म्हणून निवडून आलेल्या सुप्रियो यांनी अनेक मंत्रीपदांचा कार्यभार सांभाळला आहे.
मात्र विधानसभा निवडणुकांमधील अपयशानंतर त्यांनी केंद्रातलं मंत्रिपदही गमावलं.
मंत्रिपद जाणं हे राजकारण सोडण्याचं प्रमुख कारणांपैकी एक असल्याचं विश्लेषकांनी म्हटलं होतं.
मंत्रिपद गेल्यामुळे राजकारण सोडतोय का तर ते काही अंशी खरं आहे. परंतु निवडणुकांपूर्वीच राज्य प्रभारींशी माझे मतभेद होते.
नाव न घेता सुप्रियो यांनी पश्चिम बंगालमधील भाजपच्या मुख्य नेत्यांमध्ये कलह असल्याचं सांगितलं होतं. यामुळे कार्यकर्त्यांचा विश्वास खचत चालल्याचं त्यांनी लिहिलं होतं.
"निवडणुकीच्या आधीपासून पक्ष आणि माझ्या विचारांमध्ये मतभेद झाले होते. मला हे आधी सर्वसाधारण वाटलं मात्र नंतर याच गोष्टींना महत्त्व मिळू लागलं. या गोष्टींसाठी काही माणसं जबाबदारी होती आणि मीही. मी एक पोस्ट लिहिली, ज्यामुळे मी नियमभंग केला असं मानलं गेलं".
"मुख्य नेत्यांमधील अंतर्गह कलह कार्यकर्त्यांसाठी, पक्षासाठी घातक आहे. पाच वर्षात भाजपने पश्चिम बंगालमध्ये मोठी मजल मारली आहे. आधी मी एकटाच होतो, आता अनेक नेते आहेत.
आता पक्षात अनेक नेते आहेत. त्यांचं मार्गदर्शन पक्षासाठी उपयोगी ठरेल. आज पक्षासाठी कुणी एक असा नेता महत्त्वाचा राहिलेला नाही. हे अगदीच स्पष्ट झालं. त्यामुळे मी घेतलेला निर्णय योग्यच असेल".
सुप्रियो यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारादरम्यानही नाराजी व्यक्त केली होती.
सुप्रियो यांनी 7 जुलै रोजी पर्यावरण, वनं आणि हवामान बदल राज्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. राजीनामा देण्याचं मला सांगण्यात आलं असं त्यांनी म्हटलं होतं.
थोड्या वेळानंतर त्यांनी पोस्ट एडिट केली आणि म्हटलं की राजीनामा द्या हे सांगण्याची पद्धत योग्य नव्हती.
(ही बातमी सतत अपडेट होत आहे.)
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)























