नारायण राणेंच्या जनआशीर्वाद यात्रेतला एकदिवस नेमका कसा होता?

जनआशीर्वाद यात्रा

फोटो स्रोत, facebook

    • Author, मयांक भागवत
    • Role, बीबीसी मराठी
  • Published
  • वाचन वेळ: 3 मिनिटे

केंद्रीय मंत्री झाल्यानंतर नारायण राणे जनआशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून कोकणवासियांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत.

यात ते किती यशस्वी होतील, यावर ते पुन्हा कोकणात त्यांचं वर्चस्व प्रस्थापित करू शकतील का? हे अवलंबून आहे.

पण, राणेंची ही यात्रा कशी असते? काय होतं या यात्रेत?

यात्रेची सुरूवात कशी होते?

केंद्रीय मंत्री झाल्यानंतर राणे पहिल्यांदाच संपूर्ण कोकणाच्या दौऱ्यावर आहेत. याआधी त्यांनी पूरग्रस्त भागाचा दौरा केला होता. त्यामुळे राणेंकडून जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जातंय.

यात्रेचा कार्यक्रम आदल्या दिवशीच ठरलेला असतो. कार्यकर्त्यांना ब्रिफ करण्यात आलेलं असतं. राणे केंद्रीय मंत्री असल्याने प्रोटोकॅालनुसार प्रशासन तयारी करतं.

राणेंची यात्रा सकाळी 10 वाजता सुरू होते.

कधी दौरा सुरू होण्याआधी राणे प्रेस कॅान्फरन्स घेतात. दौरा लांबवरचा असेल तर, राणेंचा ताफा थेट सभा स्थळाच्या दिशाने कूच करतो.

नारायण राणे

फोटो स्रोत, facebook

शहरातील मुख्य रस्त्यावर असलेल्या महापुरूषांच्या पुतळ्यांवर पुष्पवर्षाव करून राणे दिवस सुरू करतात.

राणेंचे दोन्ही पुत्र निलेश आणि नितेश राणे त्यांच्यासोबत पाहायला मिळाले.

राणेंसोबत चालणारा गाड्यांचा ताफा

राणे केंद्रीय मंत्री असल्याने पोलिसांचा फौजफौटा राणेंसोबत कायम असतो. राणेंच्या गाडी पुढे स्थानिक पोलिसांची गाडी धावत असते.

नारायण राणे

फोटो स्रोत, facebook

राणेंच्या गाडीतून त्यांच्यासोबत भाजप नेते आशिष शेलार, प्रवीण दरेकर किंवा प्रसाद लाड प्रवास करताना पाहायला मिळाले.

कोकणात एकेकाळी राणेंचं वर्चस्व होतं. पण गेल्याकाही वर्षांत त्यांची कोकणावरची पकड ढिली पडलीये.

त्यामुळे कोकणावर आपली पकड अजूनही अबाधित आहे, हे दाखवण्साठी शक्तीप्रदर्शन केलं जातं.

राणेंच्या ताफ्यासोबत भाजप कार्यकर्त्यांच्या 100 पेक्षा जास्त गाड्या धावताना पाहायला मिळाल्या. प्रक्येकाच्या गाडीवर भाजपचा झेंडा असतो.

तर, मोटर सायकलवर भाजपचा झेंडा घेतलेले कार्यकर्ते गाड्यांच्या ताफ्यामागे सूसाट वेगाने गाडी हाकताना दिसून आले.

राणेंच्या ताफ्यामुळे काहीवेळ पोलिसांकडून टृफिक थांबवण्यात येतं. तर, रस्ता लहान असल्यास रस्ता गाड्यांमुळे बंद होतो.

सभास्थळी काय चित्र असतं?

नारायण राणेंची तालुका किंवा प्रमुख शहरात सभा आयोजित केलेली असते. स्थानिक नेते आणि कार्यकर्ते राणेंची वाट पाहत उभे असतात.

महिला कार्यकर्त्या हातात ओवाळणीचं ताट घेऊन तयार असतात. तर, बाहेर ढोल-ताशे वाजत असतात. कार्यकर्ते राणेंना पाहण्यासाठी उत्सुक असतात.

जनआशीर्वाद यात्रा

फोटो स्रोत, facebook

काळी पॅंट, शर्ट आणि जॅकेट हा राणेंचा ड्रेसकोड ठरलेलाच.

राणे गाडीतून उतरताच घोषणाबाजी सुरू होते. राणेंना CISF ची सुरक्षा आहे. त्यामुळे कार्यकर्त्याना आवरण्यासाठी सुरक्षा रक्षकांची धावपळ होताना पाहायला मिळाली.

राणेंच्या सभा या छोटेखानी आहेत. पण यात सामान्य लोकांपेक्षा कार्यकर्ते जास्त दिसून येत आहेत.

स्टेजवर राणेंचं स्वागत होतं. स्थानिक नेते त्यांच्याभोवती गराडा घालतात. शेलार, दरेकर यांच्या भाषणानंतर राणे बोलायला उभे रहातात.

"मला पंतप्रधान मोदींनी तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी पाठवलंय," असं म्हणत राणे प्रत्येक भाषणाची सुरूवात करतात.

राणे बोलायला सुरूवात करतात. आपल्या मंत्रालयाबाबत लोकांना माहिती देतात. युवक आणि युवतींना व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन देतात.

नारायण राणे

फोटो स्रोत, facebook

जनआशीर्वाद यात्रेत पहिल्या दिवशी राणेंनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला. त्यानंतर काहीकाळ त्यांनी टीका टाळली.

पण, दिवसभरातल्या एखाद्या सभेत ते उद्धव ठाकरेंवर टीका करतातच.

एक सभा संपली की दुसरी अशा 20 पेक्षा जास्त सभा ते संबोधित करतात.

शिवसेना विरुद्ध राणे

शिनसेना विरुद्ध राणे हा संघर्ष कोकणवासीय गेली कित्येक वर्षं पाहत आणि अनुभवत आहेत.

कणकवली आणि कुडाळमध्ये राणे आणि शिवसेना समर्थक आमने-सामने आलेले पाहायला मिळाले. दोन्ही बाजूनी घोषणाबाजी झाली.

पण पोलिसांनी वेळीच दखल घेतल्याने तणाव शांत झाला.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)