राहुल गांधी बलात्कार पीडितेच्या कुटुंबीयांच्या भेटीला

राहुल गांधी

फोटो स्रोत, Ani

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

दिल्लीत एका 9 वर्षीय दलित मुलीवर कथितरीत्या बलात्कार करण्यात आल्याचं प्रकरण समोर आलं आहे. यानंतर दिल्लीत बराच गदारोळ माजला असून विरोधकांकडून आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहेत.

दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी (4 ऑगस्ट) दुपारी पीडित मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेतली.

"आपण पीडित कुटुंबासोबत आहोत. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण मदत करणार आहे. एक इंचही मागे सरकणार नाही," अशी प्रतिक्रिया राहुल गांधींनी यावेळी दिली.

"पीडितेचे कुटुंबीय न्याय मागत आहेत. पण त्यांना न्याय मिळत नाही. त्यांना मदतीची गरज आहे," असंही राहुल गांधी यांनी म्हटलं.

या प्रकरणाची जबाबदारी कुणाची आहे, हा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना ते म्हणाले, "फक्त मदत करणं हे आपलं काम आहे, इतकंच मला माहीत आहे."

नंतर राहुल गांधींनी याविषयी एक ट्विटही केलं.

"आपल्या मुलीला, देशाच्या लेकीला न्याय मिळावा, इतकीच त्यांची मागणी आहे. तिच्या आई-वडिलांचे अश्रू हेच म्हणणं मांडत आहेत. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करीन," असं ते म्हणाले.

राहुल गांधी

फोटो स्रोत, Ani

हे प्रकरण दिल्लीच्या नांगल परिसरातील आहे. दिल्ली महिला आयोगाने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. पोलिसांचा तपास सुरू आहे.

मृत मुलीच्या कुटुंबीयांच्या मते, तिच्यावर आधी बलात्कार करण्यात आला. नंतर एका स्मशानातील पुजाऱ्याच्या मदतीने तिच्यावर घाईघाईत अंत्यसंस्कार करण्यात आले, असा त्यांचा आरोप आहे.

भाजपचा पलटवार

राहुल गांधींनी दलित मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली.

ते म्हणाले, "राहुल गांधी यांनी पॉक्सो कायदा तसंच जुवेनाईल जस्टीस कायद्यांचं उल्लंघन केलं आहे. त्यांनी सेक्शन 74 चं उल्लंघन करून मुलीच्या कुटुंबीयांची ओळख सार्वजनिकरीत्या जाहीर केली. या मुद्द्याचा ते राजकारणासाठी वापर करत आहेत."

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)