IPL 2021 : आयपीएल स्पर्धा 19 सप्टेंबरपासून युएईमध्ये पुन्हा सुरू होणार

फोटो स्रोत, BCCI/IPL
येत्या सप्टेंबर महिन्यात आयपीएलची स्पर्धा यूएईमध्ये सुरू होत आहे. पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात 19 सप्टेंबर रोजी दुबईत होणार आहे.
मे महिन्यात बायोबबलमध्ये अनेकांना कोरोनाची लागण झाल्याच्यं समोर आल्यानंतर आयपीएल स्पर्धा स्थगित करण्यात आल्या होत्या. 19 सप्टेंबरपासून आयपीएलचे सामने पुन्हा एकदा सुरू होत असून अंतिम सामना 15 ऑक्टोबरला होईल.
आयपीएलच्या दोन दिवसांनंतर आयसीसी टी-20 वर्ल्ड कप सुरू होणार आहे. बीसीसीआयने जारी केलेल्या निवेदनानुसार, "वीवो आयपीएलमध्ये 27 दिवसांच्या कालावधीत एकूण 31 सामने खेळले जातील."
"पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात अबूधाबी येथे खेळला जाईल. शारजा येथे पहिला सामना 24 सप्टेंबर रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होईल. दुबईत 13, शारजामध्ये 10 आणि अबू धाबीमध्ये 8 सामने खेळले जातील."
वृत्तसंस्था पीटीआयनुसार, पहिला पात्रता सामना 10 ऑक्टोबरला, 11 ऑक्टोबरला एलिमिनेटर सामना आणि 13 ऑक्टोबरला दुसरा पात्रता सामना होईल.
यादरम्यान संयुक्त अरब अमिरातीचे कोव्हिड-19 संदर्भातील सर्व नियम आयपीएल संघ आणि खेळाडूंना लागू असतील असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
























