कोरोना : भारतात किती टक्के लोकांचं लसीकरण झालं? जाणून घेऊया आलेखांच्या माध्यमातून

कोरोना लस

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, लसीकरण
    • Author, शादाब नझमी
    • Role, बीबीसी प्रतिनिधी
  • Published
  • वाचन वेळ: 2 मिनिटे

देशात लसीकरण मोहिमेला सुरुवात होऊन 6 महिने झाले आहेत. किती नागरिकांना लशीचे दोन्ही डोस मिळाले आहेत? एकूण लोकसंख्येच्या किती टक्के लोकांचं लसीकरण झालं आहे? याचा बीबीसीने घेतलेला हा आढावा.

एकूण लोकसंख्येच्या 6 % नागरिकांना लशीचे दोन्ही डोस मिळून त्यांची लसीकरण प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

17 टक्के भारतीयांना लशीचा किमान एक डोस मिळाला आहे.

भारतात किती लोकांचं कोव्हिड-19 लसीकरण झालं आहे?
फोटो कॅप्शन, 17 टक्के भारतीयांना लशीचा किमान एक डोस मिळाला आहे.

यंदाच्या वर्षअखेरीपर्यंत 70 टक्के लोकसंख्येचं लसीकरण पूर्ण करण्यासाठी दररोज 8.5 ते 9 दशलक्ष डोस दिलं जाणं आवश्यक आहे.

मात्र लसीकरणाचा सध्याचा दर लक्षात घेता, वर्षअखेरीपर्यंतचं हे उद्दिष्ट पूर्ण होण्याची शक्यता धूसर आहे.

दरदिवशीच्या सरासरी लसीकरणात घट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 जूनला जाहीर केलं की लसीकरण 18 वर्षांवरील सगळ्यांसाठी असेल. यानंतर एका दिवसात लसीकरणाचे सर्व विक्रम मोडीत निघाले. त्यादिवशी संपूर्ण देशात 8 दशलक्ष लोकांचं लसीकरण झालं.

दरदिवशीच्या सरासरी लसीकरणात घट
फोटो कॅप्शन, दरदिवशीच्या सरासरी लसीकरणात घट

मात्र त्यानंतर काहीच दिवसात लसीकरणाचं प्रमाण घटायला सुरुवात झाली.

23 ते 29 जून दरम्यान दरदिवशी 5.5 दशलक्ष लशीचे डोसचं प्रमाण घटून 4 दशलक्ष डोस इतकं खाली आलं. 15 जुलैपर्यंत दरदिवशी लसीचं प्रमाण आणखी घटून 3.7 दशलक्ष डोस इतकं झालं.

सर्व वयोगटात लसीकरणात घट

देशभरात सर्व वयोगटांमध्ये लशीकरणाचं प्रमाण घटलं आहे.

सर्व वयोगटात लसीकरणात घट
फोटो कॅप्शन, सर्व वयोगटात लसीकरणात घट

18 ते 44 वयोगटाला 21 जून रोजी 6.5 दशलक्ष डोस देण्यात आले. 15 जुलै कोव्हिड डॅशबोर्ड आकडेवारीनुसार, हे प्रमाण घटून 2.1 दशलक्ष डोस इतकं झालं आहे.

ग्रामीण आणि शहरी दोन्हीकडे लसीकरणात घट

लसीकरणाचं प्रमाण शहरी तसंच ग्रामीण दोन्हीकडे घटलं आहे. कोव्हिड डॅशबोर्ड आकडेवारीनुसार, 21 जून रोजी ग्रामीण आणि शहरी भागात लसीकरणाचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलं होतं. मात्र त्यानंतर लसीकरणाचा आलेख घसरता आहे.

ग्रामीण आणि शहरी दोन्हीकडे लसीकरणात घट
फोटो कॅप्शन, ग्रामीण आणि शहरी दोन्हीकडे लसीकरणात घट

अनेक राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या कमी होऊ लागल्याने अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे.

16 जुलै रोजी देशात कोरोनाचे नवे 38,000 रुग्ण आढळले तर 542 जणांचा मृत्यू झाला. मात्र तज्ज्ञांच्या मते कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते.

भारतातील कोरोना रुग्णसंख्या
फोटो कॅप्शन, भारतातील कोरोना रुग्णसंख्या

हे लक्षात घेता लवकरात लवकर लसीकरणाची प्रक्रिया पूर्ण होणं अत्यावश्यक आहे.

लसीकरणाचा सध्याचा दर लक्षात घेता, वर्षअखेरीपर्यंत हर्ड इम्युनिटी गाठण्याचं उद्दिष्टही पूर्ण होणं कठीण आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)