राज कौशल : मंदिरा बेदी यांचे पती दिग्दर्शक राज कौशल यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन

फोटो स्रोत, facebook
मॉडेल आणि अभिनेत्री मंदिरा बेदी यांचे पती राज कौशल यांचं निधन झालं आहे. वयाच्या 49 व्या वर्षी हृदयविकाराच्या धक्क्याने राज यांची प्राणज्योत मालवली.
राज कौशल हे एक दिग्दर्शक आणि चित्रपट निर्माता होते. त्यांच्या निधनानंतर बॉलीवूड इंडस्ट्रीतील कलाकार दुःख व्यक्त करत असून ते मंदिरा यांचं सांत्वन करताना दिसत आहेत.
कोण होते राज कौशल?
राज कौशल यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात कॉपी राईटर म्हणून केली होती. त्यानंतर त्यांनी दिग्दर्शक म्हणून आपली नवी ओळख बनवली.
राज यांनी अँथनी कौन है, शादी का लड्डू, प्यार में कभी कभी या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं. त्याशिवाय माय ब्रदर निखील, शादी का लड्डू आणि प्यार में कधी कभी या चित्रपटांची निर्मितीही त्यांनी केली होती.
तसंच राज कौशल यांनी अनेक जाहिरातीही बनवल्या आहेत.

फोटो स्रोत, Instagram
मंदिरा बैदी आणि राज कौशल यांचा विवाह फेब्रुवारी 1999 मध्ये झाला होता. त्यानंतर 19 जून 2011 ला मंदिरा-राज दांपत्याला पुत्रप्राप्ती झाली. गेल्या वर्षी त्यांनी 4 वर्षीय मुलीला दत्तक घेतलं होतं. त्यांच्या मुलाचं नाव वीर असून मुलीचं नाव तारा ठेवण्यात आलं आहे.
सोशल मीडियावर प्रतिक्रिया
मंदिरा बेदी यांचे पती राज यांच्या निधनाची बातमी मिळताच त्यांचे आप्तस्वकिय दुःख व्यक्त करत आहेत.
बेदी-कौशल कुटुंबीयांचं सांत्वन करत त्यांना धीर देत आहेत.
ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी राज कौशल यांना श्रद्धांजली वाहताना म्हटलं, की त्यांच्या अकाली निधनामुळे धक्का बसला आहे. मी दुःखी झालो आहे. ते एक चांगले मित्र, चित्रपट निर्माते आणि अतिशय सकारात्मक व्यक्ती होते. त्यांच्यासोबत काम करतानाच्या काही खूप चांगल्या आठवणी आहेत.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
अभिनेते मनोज वाजपेयी यांनीही जवळचे मित्र असलेल्या राज कौशल यांच्याबद्दल लिहिलं आहे. "आपल्या अतिशय जवळच्या मित्राला गमावण्यासारखं धक्कादायक आणि वेदनादायी असं दुसरं काहीच नाही. राज कौशल खूप चांगले व्यक्ती होते. यातून सावरायला वेळ लागेल."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
"आज मी माझा अतिशय जवळचा मित्र गमावला आहे. राज कौशल यांना मी अनेक वर्षांपासून ओळखत आहे. त्यांच्यासोबत मी चित्रपट केला आहे. त्यांच्या सोबतीतला प्रत्येक क्षण आम्ही एन्जॉय केला आहे. मी कधीच त्यांच्या चेहऱ्यावर आठी पाहिली नाही, ते नेहमी हसतमुख असायचे. मित्रा, तुझी नेहमी आठवण येईल," असं ट्वीट अर्शद वारसी यांनी केलं आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 3
चित्रपट निर्माते रॉनी स्क्रूवाला यांनी मंदिरा बेदी यांचं सांत्वन केलं. त्यांच्या दुःखात आपण सहभागी असल्याचं त्यांनी ट्वीट करून सांगितलं.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 4
दिग्दर्शक ओनीर यांनीही राज कौशल यांच्या निधनाबाबत शोक व्यक्त केला. राज यांनी आम्हाला वेळोवेळी पाठिंबा दिला होता, असं त्यांनी म्हटलं.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 5
अभिनेते अनुपम खेर यांनीही फेसबुकवर पोस्ट लिहून बेदी-कौशल कुटुंबीयांचं सांत्वन केलं.
मजकूर उपलब्ध नाही
Facebookवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.Facebook पोस्ट समाप्त
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)