कोरोना लस: मुंबईत आजपासून तीन दिवस होणार मोफत 'वॉक इन' लसीकरण

कोरोना लस

फोटो स्रोत, Getty Images

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

आजपासून (21 जून) भारतात 18-44 वयोगटातील नागरिकांसाठी मोफत लसीकरणाला सुरुवात होणार आहे. यासाठी मुंबईत लसीकरणाचे नियोजन वेगळ्या पद्धतीने करण्यात आलं आहे.

फेरीवाले, रिक्षाचालक यांना लसीकरणात प्राधान्य देण्याचा विचार करण्यात येत आहे अशी माहिती मुंबई महानगरपालिकेने दिली.

आठवड्यातील तीन दिवस 100 टक्के वॉक-इन लसीकरण असणार आहे. लसीकरण जलद गतीने व्हावे यासाठी सोमवार, मंगळवार आणि बुधवार या तिन्ही दिवशी मुंबई महापालिकेच्या लसीकरण केंद्रांवर वॉक इन लस दिली जाणार आहे.

मुंबई बाजारपेठा आणि सार्वजनिक वाहतुकीदरम्यान सर्वाधिक गर्दी होताना दिसत आहे. त्यामुळे फेरीवाले, रिक्षाचालक, बेस्ट बसचे ड्रायव्हर आणि इतर कर्मचारी वर्ग अशांना लसीकरणात प्राधान्य दिलं जाऊ शकतं.

आजपासून (21 जून) होणाऱ्या लसीकरण मोहिमेसाठी केंद्र सरकारकडून मुंबई महानगरपालिकेला 8 लाख 70 हजारांहून अधिक लसीकरणाचे डोस मिळण्याची अपेक्षा आहे.

गेल्या महिन्यात पालिकेला 4 लास लसीचे डोस आणि त्यापूर्वी 8 लाख 70 हजार लसीचे डोस मिळाले होते.

18 ते 44 वयोगटातही विविध टप्पे केले जाऊ शकतात का याची चाचपणी पालिकेकडून केली जात आहे. लसीकरण केंद्रांवर गर्दी होऊ नये आणि वेगाने लसीकरण व्हावे यासाठी 18 - 30 किंवा 30-44 अशा दोन टप्प्यात लसीकरण होऊ शकते का याचा विचार सुरू आहे.

किशोरी पेडणेकर

फोटो स्रोत, Twitter/Kishori Pednekar

यासंदर्भात बोलताना मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं, "देशात तरुणांचं मोफत लसीकरण सुरू होत आहे. सर्वांत मोठ्या लोकसंख्येच्या लसीकरणासाठी महानगरपालिका तयारी करत आहे. घरोघरी जाऊन लसीकरणाबद्दल बोललं जात होतं. पण आम्ही घराजवळील आरोग्य शिबिरातच लसीकरण करण्याविषयी बोललो."

प्रत्येक वॉर्डात लसीकरणासाठी एक केंद्र असणार आहे असंही किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं. ज्या सोसायट्यांना लसीकरण शिबिर राबवायचे आहे त्यांनी महापालिकेशी समन्वय करावा असं आवाहन महापौर किशोरी पेडणेकर यांनी केलं आहे.

मुंबई लोकल कधी सुरू होणार? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता त्या म्हणाल्या, "मुंबईतील रुग्णसंख्या कमी झाली असली तरी तिसऱ्या लाटेचा धोका तज्ज्ञांनी सांगितल्याने तातडीने लोकल सुरू करण्याचा विचार नाही." त्यामुळे मुंबईची लाईफलाईन असलेल्या मुंबई रेल्वेसाठी प्रवाशांना आणखी काही काळ वाट पहावी लागणार आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)