शिवसेना राणे नावाला घाबरते, परत समोर आले तर जोरदार उत्तर द्या - नितेश राणे : #5मोठ्याबातम्या

नितेश राणे

फोटो स्रोत, @NiteshRane23

फोटो कॅप्शन, नितेश राणे
Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा.

1. शिवसेना राणे नावाला घाबरते, परत समोर आले तर जोरदार उत्तर द्या - नितेश राणे

'राणे नावाने शिवसेना घाबरते. परत समोर आले तर जोरदार उत्तर द्या, आम्ही तुमच्या सोबत आहोत', असं आमदार नितेश राणेंनी भाजप कार्यकर्त्यांना म्हटलंय. टीव्ही 9 मराठीनं ही बातमी दिलीय.

राम मंदिराच्या मुद्द्यावरुन शिवसेना भवनावर मोर्चा काढल्यानंतर भाजप युवा मोर्चा आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. मोर्चा संपल्यानंतर परत जाताना काही शिवसैनिकांनी भाजप कार्यकर्ते आणि महिला पदाधिकाऱ्यांना मारहाण केल्याचा आरोप भाजप नेत्यांकडून करण्यात येतोय.

दरम्यान शिवसेना भवन हे आमच्या अस्मितेचं प्रतिक आहे. शिवसेना भवनावर मोर्चा काढायचा नाही, असं खासदार संजय राऊत यांनी भाजपला म्हटलं होतं. त्यानंतर आता भाजपचे आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेला डिवचण्यासाठी शिवसेना भवनावर मोर्चा काढणाऱ्या भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांचा सत्कार केलाय.

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

भाजप कार्यकर्त्यांच्या भेटीनंतर नितेश राणे म्हणाले, "जाऊन सांगा आज सेनाभवन समोर भिडणाऱ्या शिवसैनिकांना तुमचा उद्धव आमच्या मोदी साहेबांसमोर नाक घासून आला आहे. मग तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवत आहात? मानले मुंबईतील भाजप युवा मोर्चाला."

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

2. शिवसैनिकांचे राडे सुरूच राहिले तर भाजप कार्यकर्तेही सक्षम - चंद्रकांत पाटील

शिवसैनिकांचे राडे असेच सुरू राहिले तर भाजप कार्यकर्तेही सक्षम आहेत. शिवसैनिकांना याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला. आपलं महानगरनं ही बातमी दिली आहे.

चंद्रकांत पाटील

फोटो स्रोत, Twitter

फोटो कॅप्शन, चंद्रकांत पाटील

ते म्हणाले, "आपले राज्य आहे म्हणून शिवसेना कार्यकर्ते राडे करतील, तर त्याचे परिणाम सर्वांना भोगावे लागतील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात त्यांचं सरकार असल्याने शांतता राखण्याची जबाबदारी शिवसेनेची असल्याची जाणीव कार्यकर्त्यांना करून दिली आहे.

"आता हा विषय संपायला हवा असे आम्हालाही वाटते. तरीही शिवसैनिकांना असाच संघर्ष चालू ठेवायचा असेल तर भाजपाचे कार्यकर्ते सक्षम आहेत."

3. बारावीनंतर इंजिनियरिंगच्या दुसऱ्या वर्षाला थेट प्रवेश

बारावीत विशिष्ट गुण घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाला थेट प्रवेश मिळणार आहे.

यासाठी आतापर्यंत आवश्यक असलेल्या पात्रतेच्या निकषांमध्ये बदल करण्याचा निर्णय उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी जाहीर केला आहे. सकाळनं ही बातमी दिली आहे.

विद्यार्थी

फोटो स्रोत, Getty Images

या निर्णयामुळे निश्चित केलेले कोणतेही तीन विषय घेऊन बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे.

तसंच या अभ्यासक्रमासाठी सीईटी परीक्षाही घेतली जाणार नाही.

4. महाबळेश्वर, पाचगणी उद्यापासून सुरू

राज्यातील थंड हवेचे ठिकाण असलेले महाबळेश्वर, पाचगणी पर्यटकांसाठी खुले होणार आहेत. एबीापी माझानं ही बातमी दिली आहे.

शनिवारपासून (19 जून) संपूर्ण महाबळेश्वर पाचगणीचे पर्यटन सर्वांसाठी खुले होणार आहे. पर्यटकांसाठी काही नियम आणि अटी लागू करुन महाबळेश्वर, पाचगणी सुरु करण्याचा निर्णय वाई प्रांताधिकाऱ्यांनी घेतला आहे.

महाबळेश्वर, पाचगणीमध्ये पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांची दांडेघर नाक्यावरच रॅपिड अॅन्टीजेन तपासणी होणार आहे. तर हॉटेल व्यावसायिक कर्मचारी यांची प्रत्येकी दहा दिवसानंतर तपासणी होणार आहे. टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना महाबळेश्वर पाचगणीत एन्ट्री दिली जाणार आहे.

5. गेल्या 5 वर्षांपासून मेव्हणा करत होता भाऊजीची पोलिसाची नोकरी

पोलीस विभागात एक अजब प्रकार समोर आला आहे. गेल्या 5 वर्षांपासून भाऊजी यांच्याऐवजी मेव्हणा पोलीस म्हणून नोकरी करत असल्याचं समोर आलं आहे.

याप्रकरणी आरोपीची चौकशी सुरू आहे. तसंच एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. जागरणनं ही बातमी दिली आहे.

पोलीस

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक छायाचित्र

उत्तर प्रदेशच्या मुरादाबादमधील ठाकुरद्वारा ठाण्यात कॉन्स्टेबल अनिल कुमार यांच्याऐवजी त्यांचा मेव्हणा सुनील उर्फ सनी ड्यूटी करत होता. तो 5 वर्षांपासून हे काम करत होता.

याप्रकरणी तक्रार करण्यात आल्यानंतर झालेल्या चौकशीत पोलीस विभागातील ही चूक समोर आली. याप्रकणी अनिल कुमार यांना अटक करण्यात आली असून सुनील फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)