कोरोना: महाराष्ट्रात कोरोना मृत्यूंचा आकडा लाखापल्याड

कोरोना, महाराष्ट्र

फोटो स्रोत, INDRANIL MUKHERJEE

फोटो कॅप्शन, कोरोना
Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

कोरोना विषाणूच्या संकटाने राज्यात लाखाहून अधिक रुग्णांनी जीव गमावला आहे. गेल्या वर्षी मार्च महिन्यात राज्यात कोरोनाचे रुग्ण पहिल्यांदा आढळले होते. त्यानंतर पहिल्या आणि दुसऱ्या लाटेदरम्यान राज्यातल्या अनेकांनी कोरोनापायी जीव गमावला.

रविवारी राज्य सरकारतर्फे जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार राज्यात कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येने लाखाचा आकडा पार केला.

महाराष्ट्रात कोरोना व्हायरसची लागण झालेल्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या सध्या 1,85,527 एवढी आहे. राज्यात आतापर्यंत 58,31, 781 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे.

रविवारी 14, 433 रुग्ण बरे होऊन घरी परतले. आतापर्यंत 55, 43, 267 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात रुग्ण बरं होण्याचं प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट 95.05 % आहे.

रविवारी 12,557 नव्या रुग्णांची नोंद झाली तर 233 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत 100,130 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्याचा मृत्यूदर 1.72% टक्के एवढा आहे.

या एक लाख मृत्यूंपैकी चाळीस टक्के म्हणजे चाळीस हजार मृत्यूंची नोंद गेल्या दोन महिन्यांहून कमी काळात झाली आहे. 18 एप्रिल रोजी महाराष्ट्रात कोव्हिडमुळे मृतांचा एकूण आकडा साठ हजारांवर गेला होता.

त्याआधी सात मार्च रोजी मृत्यूचा एकूण आकडा 52,478 एवढा होता. म्हणजे केवळ तीन महिन्यांत राज्यात कोव्हिडमुळे 50 हजार जणांना प्राण गमवावे लागले. कोरोना विषाणूची दुसरी लाट किती भयानक ठरली आहे, ते या आकडेवारीवरून स्पष्ट होतं.

हे राज्य सरकारकडे नोंद झालेले अधिकृत आकडे आहेत. जाणकारांच्या मते प्रत्यक्षात आकडा यापेक्षा मोठा असू शकतो, कारण अनेकदा रुग्णांची कोव्हिड टेस्ट झालेली नसते, किंवा अचानक झालेल्या मृत्यूचं कारण स्पष्ट झालेलं नसतं.

सध्या राज्यात सक्रिय रुग्णसंख्येत घट होत असली, तरी मृत्यूची ही आकडेवारी चिंताजनक आहे. तसंच सध्या शहरांपेक्षा ग्रामीण भागात या आजाराचा प्रसार होताना दिसतो आहे.

महाराष्ट्र अजूनही कोव्हिडच्या एकूण प्रांतवार रुग्णसंख्येच्या बाबतीत जगात पहिल्या स्थानावर आहे. जॉन हॉपकिन्स विद्यापीठाच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्राखालोखाल युकेमधील इंग्लंड आणि यूएसएमधील कॅलिफोर्नियात सर्वाधिक रुग्णसंख्या नोंदवली गेली आहे.

राज्यात दुसरी लाट ओसरत असल्यामुळे काही जिल्ह्यांमध्ये कठोर निर्बंध शिथिल करण्यात येत आहेत. कोरोनामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेलाही मोठा दणका बसला आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)