चिपको आंदोलनः सुंदरलाल बहुगुणा यांचं कोरोनामुळे निधन

सुंदरलाल बहुगुणा

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, सुंदरलाल बहुगुणा
Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

पर्यावरणवादी कार्यकर्ते सुंदरलाल बहुगुणा यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. ते 94 वर्षांचे होते.

बहुगुणा यांना कोरोना व्हायर, कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याने त्यांना 8 मे रोजी हृषीकेशमधील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं आहे.

सुंदरलाल बहुगुणा यांचं नाव वृक्षतोडीविरुद्ध करण्यात आलेल्या सुप्रसिद्ध चिपको आंदोलनामुळे चर्चेत आलं होतं. या आंदोलनात बहुगुणा यांनी सक्रिय सहभाग नोंदवला होता.

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

या आंदोलनात महिला आणि पुरुष यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला होता. उत्तराखंडच्या चमोलीमध्ये जंगलाच्या रक्षणासाठी महिलांनी झाडांना मिठ्या मारून हे आंदोलन केलं होतं आणि झाडं वाचवली होती.

टिहरी परिसरात हे आंदोलन सुंदरलाल बहुगुणा यांच्या नेतृत्वाखाली झालं होतं.

1981 मध्ये बहुगुणा हिमालयातील जंगल क्षेत्रात 1 हजार मीटरपेक्षाही उंचीवर करण्यात येणाऱ्या वृक्षतोडीविरोधात आमरण उपोषणाला बसले होते.

टिहरी परिसरात धरणाविरोधी आंदोलनही करण्यात येत होतं. या आंदोलनाला बहुगुणा हे चिपको आंदोलनाचाच एक भाग असल्याचं म्हणत. बहुगुणा यांच्यावर गांधीवादी विचारांचा प्रभाव होता. बहुगुणा यांना पद्म पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आलं होतं.

मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली

पर्यावरणवादी कार्यकर्ते सुंदरलाल बहुगुणा यांना विविध क्षेत्रातील मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली आहे. बहुगुणा यांच्या कार्याचं स्मरण करून सोशल मीडियावर त्यांना श्रद्धांजली दिली जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून बहुगुणा यांना श्रद्धांजली वाहिली.

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

सुंदरलाल बहुगुणा यांच्या निधनाने देशाची अपरिमित हानी झाली आहे. त्यांनी निसर्गाचा सन्मान करत जगण्याची परंपरागत पद्धत आपल्याला पुन्हा नव्याने शिकवली होती. त्यांचा साधेपणा आणि दयाशील भावना आपण कधीच विसरू शकत नाही. बहुगुणा यांचे कुटुंबीय आणि त्यांचे समर्थन यांच्या दुःखात मी सहभागी आहे, असं मोदी म्हणाले.

माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनीही सुंदरलाल बहुगुणा यांना आदरांजली वाहिली.

ते म्हणाले, "बहुगुणा यांच्या जाण्याने मला अतीव दुःख झालं आहे. त्यांच्यासोबत माझ्या अनेक चांगल्या आठवणी आहेत. 1996 साली मी पंतप्रधान असताना बहुगुणा यांनी उपोषण थांबवण्यासाठी मी समजूत काढली होती. ते अतिशय शांत स्वभावाचे व्यक्ती होते. पण त्यांच्या तत्वांवर ते ठाम असतं. मी त्यांचा नेहमीच आदर केला."

X पोस्टवरून पुढे जा, 3
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 3

त्याचप्रमाणे ओरिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनीही बहुगुणा यांना श्रद्धांजली वाहिली.

X पोस्टवरून पुढे जा, 4
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 4

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)