डॉ. केके अग्रवाल : IMA चे माजी अध्यक्ष डॉ. अग्रवाल यांचं कोरोनामुळे निधन

फोटो स्रोत, @DrKKAggarwal
पद्मश्री पुरस्कार विजेते आणि इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. केके अग्रवाल यांचे कोरोनामुळे निधन झालं आहे. त्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतले होते. त्यानंतर त्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही होणाऱ्या संसर्गाबद्दल तुम्ही या ठिकाणी वाचू शकता.
डॉ. अग्रवाल यांच्या सोशल मीडिया हँडलवरील माहितीनुसार, सोमवारी (17 मे) रात्री साडेअकरा वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
62 वर्षीय डॉ. अग्रवाल यांना बराच काळ कोव्हिडची लागण झाली होती. त्यांच्यावर दिल्लीतील एम्समध्ये उपचार सुरू होते. गेल्या आठवड्यात ते व्हेंटिलेटरवर होते.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
वर्षभरापासून कोरोना संकटाच्या काळात डॉ. अग्रवाल खूप सक्रीय होते.
ते सोशल मीडियावर व्हीडिओद्वारे कोव्हिड-19 शी संबंधित माहिती लोकांना देत असत.
वृत्तवाहिन्यांवरही ते अनेकदा या विषयावर चर्चा करताना दिसले.
त्यांच्या ट्विटर हँडलवरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, डॉ. अग्रवाल साथीच्या काळातही लोकांना जागरूक करत होते.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)