राहुल व्होराचं कोरोनामुळे निधन, काल उपचारासाठी फेसबुक पोस्ट लिहित व्यक्त केली होती खंत

फोटो स्रोत, Irahul Vohra/facebook
अभिनेता आणि नाट्यकर्मी राहुल व्होरा यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. ते 35 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, आई-वडील आणि बहीण असा परिवार आहे, त्यांच्या निधनाच्या वृत्ताला पीटीआयने दुजोरा दिला आहे.
कालच (शनिवारी) राहुल व्होरा यांनी आपल्या उपचाराबाबतची पोस्ट फेसबुकवर लिहिली होती. त्यानंतर काही तासांनीच त्यांचे निधन झाले.
राहुल यांची खरी ओळख युट्युबर असली तरी त्यांचा वावर दिल्लीच्या नाट्य वर्तुळात होता.
राहुल यांच्या निधनाविषयी बोलताना अस्मिता थिएटर्सचे ज्येष्ठ नाट्यकर्मी अरविंद गौर यांनी बीबीसी मराठीला सांगितलं, "काही दिवसांपूर्वी राहुलला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्याच्या फुफ्फुसावर परिणाम झाला होता. आज सकाळी साडे सहा वाजता राहुल आम्हाला सोडून गेला."
राहुल यांच्याविषयी सांगताना गौर पुढे म्हणतात, "राहुल हा नेहमीच उत्साही असायचा. त्याच्या चेहऱ्यावर नेहमी हास्य असायचं. पण गेल्या काही दिवसांपासून त्यानं आशा सोडली होती."
मजकूर उपलब्ध नाही
Facebookवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.Facebook पोस्ट समाप्त
दरम्यान, राहुल व्होरा यांनी कालच फेसबुकवर पोस्ट लिहिलं होतं 'मला चांगले उपचार मिळाला असते, तर मी वाचलो असतो,' असं म्हटलं होतं.
त्यांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहिलंय, "मला चांगले उपचार मिळाले असते तर मीसुद्धा वाचलो असतो."
या फेसबुक पोस्टमध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष शिसोदिया यांना टॅग केलं आहे.
"मी लवकरच नवीन जन्म घेईन आणि चांगलं काम करेन. आता सध्या तरी मी हिम्मत गमावून बसलो आहे," असं त्यांनी या पोस्टमध्ये पुढे म्हटलं आहे.

फोटो स्रोत, Facebook
यापूर्वी राहुल यांनी 4 मे रोजी फेसबुकवर पोस्ट लिहित म्हटलं होतं, "मला कोरोनाची लागण झाली आहे."
कोरोनाच्या साथीत मनोरंजन क्षेत्रातील अनेकांचा मृत्यू झाला आहे.
काही दिवसांपूर्वीच संगीतकार श्रवण राठोड यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे.
राहुल यांच्या निधनानंतर युट्युब, ट्विटर आणि फेसबुकवर हळहळ व्यक्त केली जात आहे. राहुल यांची फेसबुक पोस्ट अंदाजे 3,000 वेळा शेअर करण्यात आली आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)























