कोरोना व्हायरस : गायत्री मंत्राचा जप केल्यास कोरोना लवकर बरा होतो? AIIMSचा अभ्यास सुरू

महिला प्राणायम

फोटो स्रोत, Getty Images

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

गायत्री मंत्राचा जप केल्याने कोरोना रुग्णांच्या तब्येतीत सुधारणा होते का? याचा अभ्यास आता AIIMS ऋषिकेशमध्ये केला जाणार आहे.

या अभ्यासासाठी केंद्र सरकारच्या विज्ञान तंत्रज्ञान विभागाकडून निधीसुद्धा उपलब्ध करून देण्यात आला आहे.

योग साधनेत महत्त्वाची मानली जाणारी प्राणायम ही श्वसनक्रियाही कोरोनाची सौम्य लक्षणं असलेल्या रुग्णांना लवकर बरी करू शकते का, याचाही अभ्यास एम्स ऋषिकेश करणार आहे.

हे दोन्ही प्रयोग तपासून पाहण्यासाठीचे क्लिनिकल ट्रायल्स सुरू करण्यासाठीची अधिकृत नोंदणीसुद्धा Indian Council of Medical Research's (ICMR) च्या clinical trial registry कडे करण्यात आली आहे.

भारतात कुठल्याही उपचारासाठी, औषधीच्या मानवी चाचणीसाठी आधी CTRIमध्ये नोंदणी करावी लागते. द हिंदू वृत्तपत्राने यासंदर्भातली सविस्तर बातमी केली आहे.

हे क्लिनिकल ट्रायल सध्या कोरोनाची मध्यम लक्षणं असलेल्या 20 रुग्णांवर करण्यात येत आहेत. यात प्रत्येकी दहाचे दोन गट केले जातील. यापैकी 10 रुग्णांना कोरोनावरचे सामान्य उपचार दिले जातील, तर इतर 10 जणांना सामान्य उपचार आणि त्याशिवाय प्राणायम तसंच गायत्री मंत्राचा जप असा दिनक्रम 14 दिवस पाळावा लागेल.

एका प्रमाणित योग प्रशिक्षकाच्या अखत्यारीत हे उपचार होतील, असं सांगण्यात आलं आहे.

याद्वारे दोन्ही गटांमधल्या सदस्यांच्या तब्येतीत काही विशेष फरक आहे का, हे तपासून या अभ्यासाचा निष्कर्ष काढला जाईल.

सौम्य आणि मध्यम लक्षणं असलेल्या रुग्णांना बरे होण्यास कमी वेळ लागतोय का किंवा त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती करण्याची शक्यता कमी करता येईल का, हेसुद्धा या क्लिनिकल ट्रायलमधून तपासलं जाईल, असं द हिंदूने या बातमीत म्हटलंय.

"पुढच्या दोन तीन महिन्यांमध्ये आम्ही या रुग्णांचं आरोग्य नियमितपणे तपासून पाहू, जेणेकरून या विषाणूमुळे तसंच औषधांमुळे त्यांच्या शरीरात काही फरक या व्यायामांमुळे पडलाय का, हे कळेल," असं AIIMS ऋषिकेशच्या सहायक प्राध्यापक डॉ. रुची दुआ यांनी द हिंदूशी बोलताना सांगितलं.

कोरोनावरच्या विविध उपचार पद्धती विकसित करण्यासाठी केंद्र सरकारच्या Department of Science and Technology तर्फे प्रायोगिक अभ्यासांसाठी अर्ज मागवण्यात आले होते. त्यात डॉ. रुची दुआ यांनी हा अर्ज केला होता. यासाठी त्यांना विज्ञान तंत्रज्ञान विभागातर्फे तीन लाखांचा निधी देण्यात आला आहे.

यापूर्वीही केंद्र सरकारच्या या विभागतर्फे इतर अशा संशोधनांसाठी निधी देण्यात आला आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)