मयुर शेळके : 'रेल्वे ट्रॅकवर पडलेल्या मुलाला पाहून मला पण भीती वाटली होती, पण...'

मयुर शेळके
Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

रेल्वे ट्रॅकवर पडलेलं मूल, त्याच्या शोधात चाचपडणारी अंध आई, समोरून धडाडत येणारी ट्रेन आणि हृदयाचे ठोके चुकवणाऱ्या त्या क्षणांमध्ये धावत येऊन मुलाला वाचवणारा एक तरूण... एखाद्या चित्रपटात शोभेल असा थरारक प्रसंग, पण प्रत्यक्षात घडलेला.

सोमवारी (19 एप्रिल) हा व्हीडिओ प्रचंड झाला. या तरुणाचं नाव - मयुर शेळके.

स्वतःचा जीव धोक्यात घालून एका लहानग्याचा जीव वाचवणाऱ्या मयुर शेळकेंचं सगळीकडून कौतुक करण्यात येतंय.

YouTube पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 1

नेमकं काय घडलं?

मयुर शेळके मध्य रेल्वेच्या वांगणी स्टेशनवर पॉइंटमन म्हणून काम करतात.

शनिवारी (17 एप्रिल) संध्याकाळी पाच वाजताच्या सुमारास ही घटना वांगणी स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 2वर घडली.

प्लॅटफॉर्मवरून एक अंध महिला तिच्या 6 वर्षांच्या मुलासह जात होती. अचानक हा मुलगा तोल जाऊन ट्रॅकवर पडला. त्याची अंध आई चाचपडत तो कुठे आहे, याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न करत होती.

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

त्याचवेळी त्याच ट्रॅकवरून समोरून उद्यान एक्स्प्रेस धडधडत येत होती.

त्याचवेळी मयुर शेळके हे वांगणी स्टेशनला उद्यान एक्स्प्रेसला झेंडा दाखवण्याचं काम करत होते.

ड्यूटीवर असणाऱ्या मयुर शेळके यांनी धाव घेत रेल्वे रुळांवरच्या त्या मुलाला प्लॅटफॉर्मवर ठेवलं, स्वतःही प्लॅटफॉर्मवर चढले आणि काहीच क्षणांत उद्यान एक्स्प्रेस बाजून धडधडत गेली.

मयुर शेळके

फोटो स्रोत, Twitter / RailMinIndia

या मुलाला रेल्वे ट्रॅकवर पडलेलं पाहून क्षणभर आपल्यालाही भीती वाटली, पण तरीही त्याचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केल्याचं मयुर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय. या मुलाचा जीव वाचवता आल्याचा आपल्याला आनंद आणि समाधान असल्याचंही मयुर म्हणाले.

व्हीडिओ कॅप्शन, मयुर शेळके - 'मी त्या मुलाला वाचवायला धावलो आणि...'

आपल्या मुलाचा जीव वाचवणाऱ्या या तरुणाचे आभार या मुलाच्या आईने - संगीत शिरसाठ यांनी मानले आहेत. स्वतःचा जीव धोक्यात घालून आपल्या मुलाचा जीव वाचवणाऱ्या मयुर यांना मोठा पुरस्कार देण्यात यावा असंही त्यांनी म्हटलंय.

मुलगा आपल्या जवळ नसून ट्रॅकवर पडल्याचं लक्षात आल्यावर या व्हीडिओमध्ये संगीता प्लॅटफॉर्मवर चाचपडत अंदाज घेण्याचा प्रयत्न करताना दिसतात.

केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनीही मयुर शेळके यांचं ट्वीट करत कौतुक केलंय.

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

मयुर शेळके यांच्या या शौर्याचं सगळीकडून कौतुक करण्यात येतंय.

X पोस्टवरून पुढे जा, 3
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 3

मध्य रेल्वेच्या विभागीय अधिकाऱ्यांनी काल मयुर शेळकेंचा सत्कार केला.

सोशल मीडियावरही अनेकांनी हा व्हिडिओ शेअर करत मयुर यांचं कौतुक केलंय.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 2

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)