सुमित्रा भावे यांचं निधन

सुमित्रा भावे

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, सुमित्रा भावे
Published
वाचन वेळ: 1 मिनिटे

सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शिका, पटकथा लेखिका आणि निर्मात्या सुमित्रा भावे यांचं वयाच्या 78 व्या वर्षी निधन झालं.

आज सकाळी 7 वाजता त्यांनी पुण्यातल्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला.

गेल्या काही दिवसांपासून त्यांना दवाखान्यात भरती करण्यात आलं होतं. त्यांच्या फुफ्फुसात इन्फेक्शन होतं.

सुमित्रा भावे यांनी पहिला लघुपट 1984ला चित्रित केला. तेव्हापासून आतापर्यंत सलग 38 वर्षं त्या नियमितपणे चित्रपट बनवत राहिल्या.

दिठी, दहावी फ, अस्तु, एक कप च्या, कासव, घो मला असला हवा, जिंदगी जिंदाबाद (हिंदी), देवराई, दोघी, नितळ या काही निवडक चित्रपटांच त्यांनी दिग्दर्शन केलं.

त्यांना यासाठी अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले.

तु्म्ही चित्रपट का बनवता, या प्रश्नाचं उत्तर देताना त्यांनी म्हटलं होतं, "चित्रपट का बनवता?' या प्रश्नाचं एका वाक्यात उत्तर द्या, अशी कुणी अट घातली तर मी म्हणेन, जीवन आणि समाज यांचा शोध घेण्यासाठीचं, एक सशक्त अवजार माझ्या हाती आल्यावर, तो घेण्याइतका आनंद चित्रपटाशिवाय दुसऱ्या कुठल्याच क्षेत्रात मिळाला नसता. म्हणून मी चित्रपट बनवत राहिले आणि बनवते. त्यातूनच उपयुक्ततावादाच्या पलीकडे जाऊन, आपण स्वत: जीवनाचा शोध घेण्यासाठी चित्रपट बनवावेत."

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)