राजेंद्र यड्रावकर : 'होय, भाजपला पाठिंबा देण्यासाठी मला रश्मी शुक्लांचा फोन आलेला'

फोटो स्रोत, Facebook
कोल्हापुरातील शिरोळचे अपक्ष आमदार आणि महाराष्ट्राचे आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांना रश्मी शुक्ला यांच्यामार्फत भाजपला पाठिंबा देण्याची ऑफर दिली होती, असं गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. त्यानंतर राज्याच्या वर्तुळात एकच खळबळ उडाली.
बीबीसी मराठीच्या प्रतिनिधी स्वाती पाटील यांनी आरोग्य राज्यमंत्री यड्रावकर यांच्याशी बातचीत करून या प्रकरणाबाबत सविस्तर माहिती घेतली.
राजेंद्र यड्रावकर यांची मुलाखत जशीच्या तशी :
प्रश्न - आमदार जिंतेद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की यड्रावकर यांना भाजपकडून पाठिंबा देण्यासाठी ऑफर आली होती. हे खरं आहे का?
राजेंद्र यड्रावकर - मी भाजप सरकारला पाठिंबा द्यावा, अशी ऑफर होती हे खरं आहे पण आर्थिक हे ते अशी काय ऑफर नव्हती.
प्रश्न - ही ऑफर नेमकी कोणाकरवी दिली होती.?
राजेंद्र यड्रावकर - ते आता जितेंद्र आव्हाडांनी सांगितलं आहे
प्रश्न - ही ऑफर देण्यासाठी तुमच्याशी कशाप्रकारे संपर्क केला होता. पैशांची ऑफऱ होती की आणखी काय
राजेंद्र यड्रावकर - माझी आर्थिक परिस्थिती बऱ्यापैकी समाधानी आहे. पैशाच्या प्रलोभनांना बळी पडणारा मी माणूस नाही. त्यामुळं मला आर्थिक प्रलोभन द्यायचा विषयच येत नाही. त्यांनी मला भारतीय जनता पार्टीला पाठिंबा द्यावा अशी काही लोकांची भूमिका होती
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 1
प्रश्न - आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत शुक्ला यांचं नाव घेतलं. तुम्ही त्याचं नाव का घेत नाही?
राजेंद्र यड्रावकर - त्यांच्या वतीने मला फोन आला होता. निश्चितपणे फोन आला होता हे खरं आहे. पण मी त्यांना त्याच वेळेला सांगितलं होतं की मी अपक्ष म्हणून निवडणुकीला उभा राहिलो आहे. माझ्या बाजूने कुणीही नसताना शिरोळ तालुक्यातील सर्वसामान्य जनतेने अतिशय मोठ्या फरकाने विजयी केले. त्या लोकांना एकत्रित करावं लागेल. त्या लोकांशी चर्चा केल्यानंतर मला जो काही निर्णय घ्यावा लागेल. त्यानंतरच्या काळात मी या लोकांचा जाहीर मेळावा घेतला. त्या मेळाव्यात या लोकांनी सांगितलं की, आपण महाविकास आघाडीला पाठिंबा देणं हे आपल्या दृष्टीने चांगलं राहील. तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने हे चांगलं राहिलं. त्यानुसार उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीला आपण पाठिंबा दिला.
प्रश्न - भाजपकडून अशी ऑफर आली होती याबाबत त्यावेळी कुणाला सांगितलं होते का आतापर्यत या प्रकरणाचा उलगडा का झाला नाही?
राजेंद्र यड्रावकर - अशा अनेक लोकांच्या ऑफर येत असतात. अपक्ष आमदार असल्याने अनेकांना वाटतं याने आपल्या पक्षात यावं त्या दृष्टीने प्रत्येक जण प्रयत्न करत असतो.
प्रश्न - केद्रात भाजप सरकार असताना आणि भाजपकडून ऑफर असताना तुम्ही महाविकास आघाडीला पाठिंबा का दिला?
राजेंद्र यड्रावकर - अपक्ष उभा राहिलो असताना विधानसभेचे नेतृत्व करण्यासाठी शिरोळच्या गोरगरिब जनतेने मला ही संधी दिली. गेली अनेक वर्ष मी राजकारणात आहे माझ्या वडिलांची शिकवण आहे सामान्य लोकांनी नेतृत्व करण्याची संधी दिली त्या लोकाचं मत जाणून घेत त्याप्रमाणं निर्णय घ्यायचा.

फोटो स्रोत, Facebook
प्रश्न - तुमच्यावर नेमका काय दबाव होता, पैशांची ऑफर होती की कायदेशीर कारवाईचा दबाव होता?
राजेंद्र यड्रावकर - माझा कुठलाही इतर व्यवसाय किंवा दोन नंबरचा धंदा नाही. त्यामुळं माझ्यावर दबाव आणायचा विषयच येत नाही. पण एकदंरित त्यांची इच्छा होती की, मी भाजपला पाठिंबा द्यावा.
प्रश्न - त्यावेळी तुमच्यामागे एक पोलिस अधिकारी लावला होता, असं आव्हाडांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. तुम्हाला असं कधी जाणवलं?
राजेंद्र यड्रावकर - जाणवलं होतं. पण त्याबद्दल आपण नंतर अधिक चर्चा करु.
प्रश्न - अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. एखाद्याला पैशाचं आमिष दाखवून पाठिंबा द्यायला लावू शकतात का असा प्रश्न आहे?
राजेंद्र यड्रावकर - पैशाच्या आमिषावर विकत जाणारा यड्रावकर घराण्यात नाही. आजपर्यत हा आमच्या घराण्याचा इतिहास आहे. आजपर्यत जिथं जिथ संघर्ष तिथं यड्रावकर असं समीकरण जुळलेलं आहे. जर पैशाच्या आमिषावर जायचं असतं इतका संघर्ष यड्रावकर घराण्याला करावाच लागला नसता.
प्रश्न - तुम्हाला आलेल्या ऑफरबद्दल सीसीटीव्ही फुटेज किंवा काही काही पुरावा आहे का ?
राजेंद्र यड्रावकर - (हात जोडत) ते ज्या त्या वेळेस बोलू.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 2
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)
























