सचिन वाझे : तपासात जे पुढे येईल त्यानुसार कारवाई करू - अनिल देशमुख

फोटो स्रोत, Facebook/Anil Deshmukh
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्कॉर्पिओ गाडीत सापडलेल्या जिलेटीन कांड्यांच्या प्रकरणानं आता गंभीर वळण घेतलंय. याप्रकरणी मुंबई पोलिसांतील API सचिन वाझे यांना राष्ट्रीय तपास यंत्रणेनं (NIA) अटक केलीय.
यावर बोलताना महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले, "मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्कॉर्पिओ गाडीमध्ये आढळलेली स्फोटके आणि मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा येथील खाडीत सापडल्याच्या घटनांची NIA आणि ATS मार्फत चौकशी केली जात आहे. या चौकशीतून जे काही निष्पन्न होईल, त्यावर राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून कायदेशीर कारवाई केली जाईल."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
यावेळी माध्यमांनी सचिन वाझे यांच्या अटकेबाबतही अनिल देशमुखांना प्रश्न विचारला. सचिन वाझे यांना निलंबित करणार का, यावर मात्र गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उत्तर दिलं नाही.
दुसरीकडे, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सचिन वाझे यांची पाठराखण केली आहे.
संजय राऊत म्हणाले, "सचिन वाझे प्रामाणिक आणि योग्यता असलेले अधिकारी आहेत, यावर मला विश्वास आहे. त्यांना जिलेटनच्या कांड्या सापडल्याप्रकरणी अटक करण्यात आलीय. एक संशयास्पद मृत्यूही झालाय. या प्रकरणाचा तपास घेण्याची मुंबई पोलिसांवर जबाबदारी आहे. कुठल्याही राष्ट्रीय तपास यंत्रणेची आवश्यकता नव्हती."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
मात्र, त्याआधी ट्विटरवरून संजय राऊत यांनी एक संकेत देणारं ट्वीट केलंय.
ते त्या ट्वीटमध्ये म्हणतात, "लोक तुमची प्रतिमा मलिन करू शकतात, तुमच्या व्यक्तिमत्वावर शिंतोडे उडवू शकतात. मात्र तुमची पुण्यकर्म ते दूर सारू शकत नाहीत. त्यांनी तुमचं वर्णन कसंही केलं तरी तुम्हाला जाणणारे तुमची प्रशंसा करून पाठ थोपटतील असं सूचक ट्वीट राऊत यांनी काही तासांपूर्वी केलं होतं असं ट्वीट राऊतांनी केलं ते घे"
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 3
या ट्वीटला कुठलेही कॅप्शन नाही. मात्र, राज्यात घडत असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर हे ट्वीट सांकेतिक मानलं जात आहे.
विरोधकांकडून टीकेचा भडीमार
भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी सचिन वाझे यांच्या अटकेनंतर महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि मुंबईचे पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांच्या हकालपट्टीची मागणी केलीय.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 4
तर भाजप आमदार राम कदम यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून सचिन वाझेंच्या नार्को टेस्टची मागणी केलीय.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 5
हे वाचलंत का?

YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)