ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांचे निधन

श्रीकांत मोघे

फोटो स्रोत, Social media viral photo

Published
वाचन वेळ: 1 मिनिटे

ज्येष्ठ मराठी अभिनेते श्रीकांत मोघे निधन झालं आहे. ते 91 वर्षांचे होते.

श्रीकांत मोघे यांनी आपल्या कारकिर्दीत 60 पेक्षा जास्त नाटकं, तर 50 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केलं होतं.

उंबरठा, दोन्ही घरचा पाहुणा, सिंहासन, वासुदेव बळवंत फडके या चित्रपटांचा त्यामध्ये समावेश होतो. तसंच वाऱ्यावरची वरात या नाटकातील त्यांची भूमिकाही अत्यंत गाजली होती.

श्रीकांत मोघे यांनी आपल्या नाट्यप्रवासावर आधारित 'नटरंगी रंगलो' हे आत्मचरित्र लिहिलं आहे.

श्रीकांत मोघे यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण सांगली जिल्ह्यातील किर्लोस्करवाडी येथे झालं. पुढे महाविद्यालयीन शिक्षण सांगलीत विलिंग्डन कॉलेजमध्ये झालं. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते पुणे आणि मुंबई येथे गेले.

शाळकरी वयापासूनच श्रीकांत मोघे हे नाट्य-अभिनयाकडे वळले. श्रीकांत मोघे हे मराठी कवी सुधीर मोघे यांचे मोठे भाऊ होते.

अभिनेते आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी श्रीकांत मोघे यांना श्रद्धांजली अर्पण करताना म्हटलं की, त्यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीतील सोन्यासारखा माणूस हरपला. चांगल्या कामासाठी त्यांच्याकडे अपार कौतुक होते आणि हातचं काही राखून न ठेवता मार्गदर्शनही होते.

ISWOTY

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)