अमिताभ बच्चन यांची प्रकृती बिघडली, आजार अस्पष्ट

फोटो स्रोत, @SrBachchan
बिग बी अमिताभ बच्चन यांची एक सर्जरी होणार आहे. त्यांनी स्वतः आपल्या ब्लॉगवरून ही माहिती दिली.
कधी ट्विटर तर कधी ब्लॉगवर सक्रिय असणारे अमिताभ बच्चन यांनी शनिवारी रात्री उशिरा आपल्या ब्लॉगवरून ही माहिती दिलेली आहे. अगदी दोन ओळींचा हा ब्लॉग आहे.
त्यात ते लिहितात, "मेडिकल कंडिशन... सर्जरी... अधिक काही लिहू शकत नाही..."
अमिताभ बच्चन यांच्या या ब्लॉगमुळे अर्थातच त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसलेला आहे. अमिताभ यांना काय झालंय, त्यांच्यावर कुठली शस्त्रक्रिया होणार आहे, याविषयी अंदाज बांधले जात आहेत.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
हा ब्लॉग लिहिण्याच्या काही तास आधी त्यांनी इंस्टाग्रामवरसुद्धा स्वतःचा एक फोटो शेअर केला होता. त्या फोटोखाली त्यांनी काहीही लिहिलेलं नाही. मात्र खूप सारे प्रश्नार्थक चिन्ह टाकलेले आहेत.
आधी फोटो आणि नंतर ब्लॉग यामुळे अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांमध्ये काळजीचे वातावरण आहे त्याचे चहाते त्यांच्यासाठी सदिच्छाही व्यक्त करत आहेत.
गेल्या वर्षी अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यावेळी ते काही दिवस हॉस्पिटलमध्ये दाखल होते. मात्र त्यांनी कोरोनावर यशस्वी मात केली.
अमिताभ बच्चन यांच्यावर शस्त्रक्रिया करण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वीही त्यांच्यावर अनेक वेळा शस्त्रक्रिया झालेली आहे.
कुली चित्रपटाच्या शूटिंगवेळी झालेल्या अपघातानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली होती.
अमिताभ बच्चन सध्या अनेक चित्रपटांच्या शुटींगमध्ये व्यग्र आहेत. या वर्षी अमिताभ बच्चन यांचे दोन चित्रपट प्रदर्शित होत आहेत. रुमी जाफरी दिग्दर्शित 'चेहरे' आणि नागराज मंजुळे यांच्या 'झुंड' या सिनेमात अमिताभ बच्चन झळकणार आहेत.
याशिवाय ब्रह्मास्त्र या सिनेमात सुद्धा अमिताभ बच्चन काम करत आहेत. मात्र या सिनेमाचं शूटिंग अनेक कारणांमुळे रखडला आहे. या सिनेमामध्ये अमिताभ बच्चन यांच्याबरोबर रणबीर कपूर आणि आलिया भटसुद्धा दिसणार आहेत.
या शिवाय अजय देवगन सोबतच्या 'मेडे' या सिनेमातसुद्धा अमिताभ बच्चन दिसणार आहेत. स्वतः अजय देवगन या सिनेमाचं दिग्दर्शन करणार असल्याचं सांगितलं जातं.
या चित्रपटांव्यतिरिक्त अमिताभ बच्चन यांच्याकडे आणखीही काही प्रोजेक्ट असल्याचं आणि लवकरच त्यांची घोषणा होणार असल्याचं सांगितलं जात आहे.
काही दिवसांपूर्वी अमिताभ बच्चन यांनी ट्विट करत, "चेहरे, झुंड, ब्रम्हास्त्र... हे आहेत काही येणारे क्षण... लवकरच आणखीही काही येतील," असं म्हटलं होतं.
त्यामुळे या मेगाबजेट सिनेमांव्यतिरिक्त आणखीही काही सिनेमांमध्ये अमिताभ बच्चन दिसतील, असे अंदाज त्यावेळेस बांधले जाऊ लागले होते.
मात्र आता अमिताभ बच्चन यांच्यावर शस्त्रक्रिया होणार असल्याने शूटिंगवर काही परिणाम होतो का, हे बघावं लागेल.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)
























