संजय राठोड पूजा चव्हाण प्रकरणः पोहरादेवीच्या कबीरदास महाराजांना कोरोनाचा संसर्ग

संजय राठोड पूजा चव्हाण प्रकरणः पोहरादेवीच्या कबिरदास महाराजांना कोरोनाचा संसर्ग

फोटो स्रोत, Nitesh Raut/BBC

    • Author, नितेश राऊत
    • Role, बीबीसी प्रतिनिधी, अमरावती
  • Published
  • वाचन वेळ: 2 मिनिटे

पोहरादेवी येथील कबीरदास महाराज यांना कोरोनाची लागण झाली आहे. 21 तारखेला त्यांनी कोरोना चाचणी केली होती. त्यात काल त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याचं महंत जितेंद्र महाराज यांनी सांगितले.

कबीरदास महाराज यांच्यासह कुटुंबातील आणखी पाच जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. दोन दिवसांपूर्वी वनमंत्री संजय राठोड यांनी पोहरादेवीत शक्ती प्रदर्शन केले होते. त्यात कबिरदास महाराज उपस्थित होते.

संत कबीरदास महाराज हे जगदंबा देवी प्रस्थानचे महंत आहेत. कबीरदास महाराज यांच्या सह  कुटुंबातील 3 जणांना  तर त्यांच्या भावाची कुटुंबातील दोन जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहे.  

संजय राठोड यांचा 21 फेब्रुवारीला पोहरादेवी दौरा असल्यामुळे त्यांनी कोरोना चाचणी केली होती. काल त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. मात्र बाधित असलेले महंत कबीरदास महाराज हे वन मंत्री राठोड यांच्यासोबत होते. त्या मुळे चिंतेत वाढ झाली आहे. पोहरादेवीला गर्दी जमली होती. त्यामुळं पोहरादेवीत गर्दी करणाऱ्यांसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे.

वाशीम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे आज सकाळपासून झालेल्या गर्दीबाबत माध्यमांत येत असलेल्या बातम्यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली असून कोविडच्या काळात अशारीतीने आरोग्याचे नियम न पाळता गर्दी होत असेल तर संबंधितांवर जिल्हा व पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी असे निर्देश त्यांनी दिले आहेत.

संजय राठोड पूजा चव्हाण प्रकरणः पोहरादेवीच्या कबिरदास महाराजांना कोरोनाचा संसर्ग

फोटो स्रोत, Facebook

त्यांनी वाशीम जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांना याचा अहवाल देण्यास सांगण्याच्या सूचना मुख्य सचिवांना दिल्या आहेत.

दोन दिवसांपूर्वी राज्यातही कोविड परिस्थितीसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी वर्षा येथे एका बैठकीत आढावा घेतला तसेच मुंबई महानगर क्षेत्रातील महानगरपालिका आयुक्तांशी देखील संसर्ग रोखण्यासंदर्भात करीत असलेल्या उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केले.

मुख्यमंत्री यावेळी म्हणाले होते की, गेले वर्षभर आपण अतिशय संयमाने व निर्धाराने कोविडची लढाई लढत आहोत. आपले अनेक आरोग्य कर्मचारी, पोलीस तसेच प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी जीवावर उदार होऊन हा संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.

सर्वात महत्वाचे म्हणजे या संपूर्ण काळात सर्व महत्वाचे धार्मिक सण आणि उत्सव नागरिकांनी शांततेत आणि शासनाने आखून दिलेल्या नियमाप्रमाणे पार पाडले.

संजय राठोड पूजा चव्हाण प्रकरणः पोहरादेवीच्या कबिरदास महाराजांना कोरोनाचा संसर्ग

फोटो स्रोत, Nitesh Raut/BBC

या काळात मोठमोठी धार्मिक स्थळे देखील नियमांचे पालन करीत होती आणि आता देखील मिशन बिगिन अगेनमध्ये या कार्यपद्धतीचे पालन करणे आपली जबाबदारी आहे.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

मी परवाच माझ्या सोशल मीडिया लाईव्हच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या धार्मिक, राजकीय, सामाजिक कार्यक्रमांना परवानगी मिळणार नाही हे याचसाठी सांगितले कारण कोरोनाची दुसरी लाट येणे आपल्या सगळ्यांसाठी काळजीचा विषय आहे. शासन म्हणून आम्ही तयारच आहोत पण नागरिक म्हणून प्रत्येकाची वैयक्तिक जबाबदारी पण आहे हे सर्वानी लक्षात ठेवावे असेही मुख्यमंत्री म्हणाले.

ISWOTY

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)