सुप्रिया सुळे जेव्हा अजित पवारांचं लोकसभेत कौतुक करतात....

सुप्रिया अजित

फोटो स्रोत, Getty Images

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

केंद्रीय अर्थसंकल्पावर लोकसभेत बोलताना राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांचं भरभरून कौतुक केलंय.

एवढंच नाही, अजित पवारांची लोकसभेत स्तुती करताना सुप्रिया सुळेंनी अर्थ मंत्रालयाच्या कारभारावरून भाजपला चांगलाच होला हाणला.

"अर्थ मंत्रालय कसं चालवायचं, याचं मार्गदर्शन, तुम्ही अजित पवारांकडून घेतलं पाहिजे," असं सुप्रिया सुळे भाजप नेत्यांना उद्देशून म्हणाल्या.

लोकांकडून चांगल्या कल्पना नेहमीच घेतल्या पाहिजेत, असं म्हणत सुळेंनी अजित पवारांचं कौतूक केलं.

अर्थसंकल्पावरीलस भाषणात सुप्रिया सुळे यांनी जीएसटीचा मुद्दा उपस्थित केला. केंद्राकडून राज्याला 26,597 हजार कोटींच जीएसटीचं येणं बाकी असल्याचं त्यांनी लोकसभेत सांगितलं.

सुळे यांनी लोकसभेत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण आणि महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार यांची तुलना केली.

संरक्षणमंत्री निर्मला सितारामन

सुप्रिया सुळे लोकसभेत म्हणाल्या, "मोदी सरकारच्या अर्थमंत्र्यांनी देशातील प्रत्येक खासदाराचे 12 कोटी रूपये न विचारता परस्पर घेऊन टाकले. लोक विचारतात, एमपीलॅड फंड द्या. पण, तो तर मोदी जी घेऊन गेले. आता अडीच वर्षांसाठी काहीच मिळणार नाही."

याउलट, "राज्याच्या अर्थमंत्र्यांनी हे सुनिश्चित केलं की, प्रत्येक आमदाराला, मग तो विरोधी पक्षातील असू दे. त्यांना 5 कोटी रूपयांचा निधी प्रत्येक वर्षाला मिळेल. यात कपात करण्यात आलेली नाही."

"हा केंद्रीय आणि राज्याच्या अर्थमंत्र्यांमधील मुलभूत फरक असल्याचं," सुळे यांनी लोकसभेत सांगितलं.

सुप्रिया सुळे पुढे म्हणल्या, "जीएसटी येत नसतानाही, राज्य सरकारकडून योग्य व्यवस्था केली जात आहे. तुम्ही त्यांच्याकडून काहीतरी नक्की घेऊ शकता."

महाविकास आघाडी सरकारमध्ये अजित पवार नाराज आहेत अशा बातम्या सतत ऐकू येत असतात. सुप्रिया सुळे आणि अजित पवारांच पटत नाही, अशी चर्चाही राजकीय वर्तुळात ऐकायला मिळते.

ISWOTY

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)