You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक भीषण अपघातात जखमी, पत्नीचा मृत्यू
केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांच्या गाडीला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात त्यांची पत्नी विजया यांचं निधन झालं आहे. त्यांच्या स्वीय सहाय्यकाचाही त्यात मृत्यू झाला आहे. तर श्रीपाद नाईक यांची स्थिती गंभीर असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ते गोकर्णला जात असताना त्यांच्या गाडीला उत्तर कन्नड जिल्ह्यात अंकोला तिथं भीषण अपघात झाला. हा अपघात अंकोला तालुक्यातील हिल्लूर- होसकंबी गावात झाला.
नाईक कुटुंबीय येल्लापूरमधल्या गंटे - गणपती देवस्थानाला भेट देऊन पुढे गोकर्णला जात होते. तत्पूर्वी गणपती देवस्थानांमध्ये त्यांनी सपत्नीक पूजा केली होती. आणि संध्याकाळी ७ वाजता गोकर्णला रवाना झाले.
गोकर्णला जाण्यासाठी त्यांनी राष्ट्रीय महामार्ग ऐवजी दुसऱ्या मार्ग घेतला. खराब रस्त्यामुळे गाडीचालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि गाडीला अपघात झाला असं सांगितलं जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासोबत या श्रीपाद नाईक यांच्या प्रकृतीबाबत फोनवरून चर्चा केली आहे.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी देखील प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा केली आहे. त्यांनी ट्वीट करून याची माहिती दिली आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)