सौरव गांगुली यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज

सौरव गांगुली

फोटो स्रोत, Prodip Guha

फोटो कॅप्शन, सौरव गांगुली
Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

भारतीय संघाचे माजी कर्णधार आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांना अपोलो हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वी हृदयविकाराचा सौम्य झटका आला होता. त्यानंतर त्यांना अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. तिथे त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली. त्यांची प्रकृती स्थिर असल्याने 7 जानेवारीला त्यांना घरी सोडण्यात आलं होतं.

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

हॉस्पिटलमधून निघताना सौरव यांनी फोटो ट्वीट केला होता. मी ठीक असून, लवकरच कामाला लागेन असं त्यांनी हॉस्पिटलबाहेर बोलताना सांगितलं होतं.

मात्र, 27 जानेवारीला सौरव गांगुली यांना पुन्हा अँजिओप्लास्टीसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. आज (31 जानेवारी) हॉस्पिटलमधून सोडण्यात आलं.

सौरव गांगुली आता पूर्णपणे बरे आहेत, असं अपोलो हॉस्पिटलचे डॉ. राणा दासगुप्ता म्हणाले.

यापूर्वी जेव्हा सौरव गांगुली यांना सोडण्यात आलं होतं, तेव्हा डॉक्टर रुपाली बसू यांनी सांगितलं होतं की, सौरव गांगुली तीन ते चार आठवड्यात दैनंदिन रूटीन सुरू करू शकतील.

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

काही दिवसांपूर्वी सौरव यांनी घरातल्या जिममध्ये व्यायाम करत असताना गांगुली यांना छातीत दुखू लागलं होतं. त्यानंतर त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं.

गांगुली यांच्याबाबतचं वृत्त पसरताच सोशल मीडियावर गेट वेल सूनच्या सदिच्छांचा पाऊस पडला आहे. प्रिन्स ऑफ कोलकाता अशी बिरुदावली लाभलेले गांगुली भारतीय संघाच्या यशस्वी कर्णधारांपैकी एक आहेत.

113 टेस्ट, 311 वनडेमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलेल्या गांगुली यांनी मॅचफिक्सिंगचं झाकोळ भारतीय क्रिकेटवर असताना नेतृत्वाची धुरा हाती घेतली.

अव्वल संघांविरुद्ध, प्रतिकूल खेळपट्यांवरही जिंकू शकेल असा संघ तयार करण्याचं काम गांगुलीने केलं.

वीरेंद्र सेहवाग, सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्याबरोबरीने गांगुली यांनी अनोखं पंचक तयार केलं.

सौरव गांगुली

फोटो स्रोत, NurPhoto

फोटो कॅप्शन, सौरव गांगुली

गांगुलीने असंख्य युवा खेळाडूंना संधी दिली. महेंद्रसिंग धोनी हे त्याचं उत्तम उदाहरण.

गांगुलीने विजयी संघाचा पाया रचला ज्यावर महेंद्रसिंग धोनी आणि नंतर विराट कोहली यांनी कळस चढवला आहे.

गांगुली यांनी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)