2021: उद्धव ठाकरेंनी दिल्या नववर्षाच्या शुभेच्छा

उद्धव ठाकरे

फोटो स्रोत, CMOMaharashtra/facebook

फोटो कॅप्शन, उद्धव ठाकरे
Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

नव्या वर्षाच्या शुभेच्छा देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला वैयक्तिक आरोग्यासोबतच इतरांच्या आरोग्याचीही काळजी घेण्याचा संकल्प करण्याचे आवाहन केलं आहे.

नववर्षाच्या निमित्ताने उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला उद्देशून पत्र लिहिलं आहे.

कोरोना काळ आणि येणाऱ्या भविष्यात आपलं वर्तन कसं असावं, याविषयी त्यांनी या पत्रात लिहिलं आहे.

उद्धव ठाकरे यांचं पत्र -

"गेले वर्षभरात संपूर्ण जग कोरोनाशी लढा देत आहे. महाराष्ट्राने देखील लोकसहभागामुळे अतिशय जबाबदार पद्धतीने कोरोनाची लढाई लढली आहे. आज आपण अनेक मार्गांनी कोरोना काहीशा प्रमाणात कमी करत आणला असला तरी येणाऱ्या वर्षात बेसावध न राहता आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेणं महत्वाचं आहे.

"एक नवीन जीवनपद्धती आपण शिकलो आहोत. यामध्ये मास्क घालणे, सुरक्षित अंतर ठेवणे, हात स्वच्छ ठेवणे यासारख्या त्रिसूत्रीचा अवलंबं आपण करत आहेत. वर्क फ्रॉम होम, ऑनलाईन शिक्षणासारख्या माध्यमातून तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त नाविन्यपूर्ण पद्धतीने उपयोग करत आहोत.

उद्धव ठाकरे यांनी लिहिलेलं पत्र

फोटो स्रोत, CMOMaharashtra/facebook

फोटो कॅप्शन, उद्धव ठाकरे यांनी लिहिलेलं पत्र

"पुढील काळ कसा असेल याचा अंदाज बांधता येणे अवघड आहे. लस आपल्यापर्यंत येईल आणि ती सर्वांना मिळेल हा एक भाग झाला. पण दरम्यान कोरोना विषाणूच्या बदलत्या रुपामुळे उद्धभवलेल्या परिस्थितीचाही आपल्याला गांभीर्याने विचार करावा लागेल.

"आपण पुनश्च: हरी ओम म्हणत सर्व गोष्टी टप्प्याटप्प्याने सुरू करत आहोत. आता आपल्याला मागे परतायचे नाही. कोरोनापासून स्वातंत्र्य मिळवायचे असेल तर नियम आणि कायदे यापेक्षा आता स्वयंशिस्त पाळणे याला सर्वोच्च प्राधान्य द्यावे लागेल. विशेषत: नवीन पिढीवर याची जास्त जबाबदारी आहे. नव्या वर्षात आपण जबाबदार नागरिक म्हणून सर्वांच्याच आरोग्याची काळजी घेण्याचा निर्धार मनोमन करणे गरजेचे आहे,

"आपली आव्हाने कमी होणार नाहीत. शासन यंत्रणा कृतीशील आणि गतीमान आहे. नैसर्गिकं आणि माननिर्मित संकटे नेहमीच येतात परंतु त्याचा सामना सावधपणे आणि शिस्तबद्ध पद्धतीने करुयात."

या पत्रात कोरोना काळात काम करणारे डॉक्टर्स, परिचारिका, पोलीस, शासकीय आणि महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री 8 वाजता बीबीसी मराठीच्या फेसबुक पेजवर कोरोना पॉडकास्ट पाहायला विसरू नका.)