31 डिसेंबरसाठी प्लॅन करताय? सरकारचे 'हे' नवीन नियम माहिती आहेत का?

नवीन वर्ष

फोटो स्रोत, Getty Images

Published
वाचन वेळ: 1 मिनिटे

31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर रात्रीच्या वेळेस संचारबंदीसह राज्य सरकारने आणखी काही नियम लागू केले आहेत. गृह विभागाने यासंदर्भात परिपत्रक जारी केले आहे.

नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी 31 डिसेंबरच्या रात्री सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये असे आवाहन सरकारने केले आहे. 60 वर्षांवरील वृद्ध नागरिकांनी आणि 10 वर्षाखालील लहान मुलांनी शक्यतो घराबाहेर पडू नये अशी सूचना गृह विभागाने केली आहे.

नाईटलाईफ

फोटो स्रोत, Getty Images

नवीन वर्षाच्या कार्यक्रमांसाठी राज्य सरकारचे नवीन नियम

गृह विभागाने आपल्या परिपत्रकात काय म्हटले आहे ते पाहूया,

  • 1 जानेवारीला नवीन वर्षाच्या निमित्ताने नागरिकांनी घराबाहेर न पडता नवीन वर्षाचे स्वागत साधेपणाने घरीच साजरे करावे.
  • 31 डिसेंबरला नागरिकांनी समुद्रकिनारे, बाजारपेठा आणि बागेत गर्दी करू नये. सोशल डिस्टंसिंगचे पालन करावे. तसंच मास्क वापरणेही बंधनकारक राहील.
  • दरवर्षी 31 डिसेंबर आणि 1 जानेवारीला नागरिक गेट वे ऑफ इंडिया, मरिन लाईन्स, गिरगाव चौपाटी, जुहू चौपाटी आणि राज्यातील इतर ठिकाणी गर्दी करत असतात. कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता नागरिकांनी आरोग्याच्यादृष्टीने आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी.
  • 60 वर्षांवरील वृद्ध नागरिकांनी आणि 10 वर्षांखालील लहान मुलांनी शक्यतो घराबाहेर पडू नये अशी सूचना गृह विभागाने केली आहे.
  • नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी नागरिकांनी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करू नये. धार्मिक स्थळी गर्दीही करू नये.
  • फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येऊ नये. ध्वनीप्रदूषणाच्या अनुषंगाने नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.
  • स्थानिक प्रशासनाने विहित केलेल्या नियमांचे पालन करावे.
  • रात्री अकरा ते सकाळी सहावाजेपर्यंत संचारबंदी असणार आहे. यावेळात सार्वजनिक ठिकाणी नागरिकांना गर्दी करता येणार नाही. एकाच वेळी चारहून अधिक नागरिकांना एकत्र थांबता येणार नाही.
  • संचारबंदीत रात्री अकरा ते सकाळी सहा वाजेपर्यंत रेस्टॉरंट, हॉटेल्स बंद राहणार आहेत.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)