कोरोनाच्या नव्या प्रजातीमुळे घाबरुन जाण्याची गरज नाही- डॉ. हर्षवर्धन

फोटो स्रोत, Getty Images
कोरोनाच्या नव्या प्रजातीमुळे घाबरुन जाण्याची गरज नाही असं मत डॉ. हर्ष वर्धन यांनी व्यक्त केलं आहे. सरकार सावध असल्याचंही त्यांनी सांगितलं.
युकेमध्ये कोरोना व्हायरसची नवी स्ट्रेन (प्रजाती) सापडल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून येत आहेत. या बातम्यांची दखल घेऊन जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) युके सरकारसोबत याविषयी सखोल चर्चा केली.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
कोरोनाच्या या नव्या प्रजातीच्या माहितीनंतर इंग्लंडवरुन येणारी सर्व विमाने रद्द करावीत आणि आलेल्या प्रवाशांना क्वारंटाइन करावे अशी मागणी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
कोरोना व्हायरसच्या मूळ प्रजातीपेक्षा नव्या प्रजातीचा प्रसार जास्त वेगाने होत आहे. पण ही प्रजात जास्त जीवघेणी नाही. युकेसह नेदरलँड्स, डेन्मार्क आणि ऑस्ट्रेलियातही नवी प्रजात सापडल्याचं WHO ने बीबीसीला सांगितलं.
सध्या कोरोना व्हायरसवरच्या लशी बाजारात येण्यास सुरुवात झाली आहे. अशा स्थितीत कोरोनाच्या या नव्या प्रजातीतील फरकामुळे त्याच्यावर लशीचा प्रभाव पडेल की नाही हा प्रश्न उपस्थित करण्यात येत होता.
पण कोरोनाच्या नव्या प्रजातीवर लस कशा पद्धतीने परिणाम करते, हे अद्याप स्पष्ट नाही.
युकेमध्ये दक्षिण-पूर्व इंग्लंडसह लंडनमध्ये सध्या लॉकडाऊन घोषित करण्यात आलं आहे. हे लॉकडाऊन कठोर स्वरूपाचं आहे. वेगाने पसरत चाललेल्या कोरोना व्हायरसला आळा घालण्यासाठी हे लॉकडाऊन करण्यात आल्याचं सरकारने म्हटलं आहे.
कोरोनाच्या नव्या प्रजातीमुळे युरोपात मात्र खळबळ उडाल्याचं चित्र आहे.
रविवारी (20 डिसेंबर) नेदरलँड्सने युकेमधून येणाऱ्या प्रवासी विमानांवर बंदी घातली. ही बंदी 1 जानेवारीपर्यंत लागू असेल.
युकेमध्ये नव्या प्रजातीचा व्हायरस निर्माण झाल्याचं समजताच नेदरलँड्सने हा निर्णय घेतला आहे. नव्या विषाणूचा धोका किती प्रमाणात आहे याचा अभ्यास करण्यात येईल, हा धोका कमी कसा करता येईल, याचे प्रयत्न करण्यात येतील, असं नेदरलँड़्स सरकारने म्हटलं.

फोटो स्रोत, Getty Images
युकेमधून युरोपात दाखल होऊ शकणाऱ्या या व्हायरससंदर्भात युरोपियन महासंघातील सदस्य देशांसोबत चर्चा करणार असल्याचंही नेदरलँड्सने म्हटलं.
या विषयाची अधिक माहिती घेण्यासाठी बीबीसीने WHO च्या साथरोगतज्ज्ञ मारीया व्हॅन केरखोव्ह यांच्याशी चर्चा केली.
"कोरोना साथ सुरू झाल्यापासूनच या विषाणूने आपल्या स्वरुपात बदल केल्याचं जगभरात आढळून आलं आहे," असं केरखोव्ह यांनी सांगितलं.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)