कोरोना : लस टोचून घेणाऱ्या हरियाणाच्या आरोग्यमंत्र्यांना कोरोनाची लागण

फोटो स्रोत, Getty Images
हरियाणाचे आरोग्यमंत्री अनिल वीज यांना कोरोनाची लागण झाली आहे. आपली कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती स्वतः वीज यांनी ट्वीट करून दिली.
आपल्या ट्वीटमध्ये ते म्हणतात, "माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी अंबाला कँटोनमेंट येथील सिव्हील रुग्णालयात दाखल झालो आहे. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी, हा माझा सल्ला आहे."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
मंत्री अनिल वीज यांनी 20 नोव्हेंबर रोजी अंबाला येथील एका रुग्णालयात लस टोचून घेतली होती. लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीअंतर्गत वीज यांना लस टोचण्यात आली होती.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
अनिल वीज यांना कोरोना झाल्याचं निष्पन्न झाल्यानंतर त्यांच्यावर लशीची चाचणी घेणाऱ्या भारत बायोटेक कंपनीने यावर स्पष्टीकरण दिलं आहे.
भारत बायोटेक कंपनीनं काय स्पष्टीकरण दिलंय?
या लशीच्या ट्रायलदरम्यान एका व्यक्तीला 28 दिवसांच्या अंतराने दोन डोस दिले जात असल्याचं भारतात कोव्हॅक्सिन तयार करणाऱ्या भारत बायोटेक कंपनीने म्हटलंय.
दुसरा डोस दिल्याच्या 14 दिवसांनंतरच लशीचे परिणाम समजू शकत असल्याचं कंपनीने म्हटलंय. या लशीचे दोन डोस घेणाऱ्या व्यक्तींसाठीच ती प्रभावी ठरते.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 3
या लशीच्या तिसऱ्या टप्प्यातल्या चाचणीत सहभागी होणाऱ्या लोकांपैकी 50 टक्के लोकांना लस दिली जाते, तर इतर 50 टक्के जणांना प्लासिबो (Placebo) म्हणजे फक्त मानसिक समाधानापुरतं औषध दिलं जात असल्याचं कंपनीने सांगितलंय.
नवीन औषधांच्या वा लशीच्या चाचणी दरम्यान असं केलं जातं. ज्याने लोकांमध्ये आपल्याला लस देण्यात आल्याची मानसिकता तयार होते, आणि ती लस वा औषध घेणाऱ्यांच्या तुलनेत ते न घेतलेल्यांच्या शरीरावर काय परिणाम होतायत, याचा अभ्यास संशोधकांना करता येतो.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)