अजित पवार क्वारंटाईन पण कोरोनाची लागण नाही - कुटुंबीयांची माहिती

@AjitPawarSpeaks

फोटो स्रोत, @AjitPawarSpeaks

Published
वाचन वेळ: 1 मिनिटे

अजित पवार यांना कोरोनाची लागण झाल्याच्या बातम्या वेगवेगळ्या मीडिया हाऊसकडून देण्यात येत आहेत. पण त्यांच्या निवटवर्तीयांकडून मात्र हे वृत्त फेटाळण्यात आलं आहे.

अजित पवार यांचे स्वीय सहाय्यक सुनीलकुमार मुसळे यांनी बीबीसीला दिलेल्या माहितीनुसार अजित पवार यांची काल (21 ऑक्टोबर) दुपारी कोरोना चाचणी झाली. पण ती निगेटिव्ह आली आहे. पण थकव्यामुळे अजित पवार सध्या मुंबईतल्या घरी विश्रांती घेत आहेत.

अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनीसुद्धा मात्र हे वृत्त फेटाळलं आहे. तसंच अजित पवार यांच्या कुटुंबातल्या इतर सदस्यांनीसुद्धा हे वृत्त फेटाळलं आहे.

बीबीसीशी बोलताना "अजित पवार यांना कोरोनाची लागण झालेली नाही. त्यांची तब्येत उत्तम आहे. आफवांवर विश्वास ठेवू नका. सततच्या दौऱ्यांमुळे थकवा आल्याने विश्रांतीसाठी ते क्वारंटाईन आहेत," अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे.

अजित पवार यांना कोरोना झाल्याच्या बातम्या या अफवा असल्याचं निकटवर्तीयांचं म्हणणं आहे.

मंत्रिमंडळ बैठक रद्द

राज्य मंत्रिमंडळाची आजची बैठक रद्द करण्यात आली आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतला जाणार होता. तसंच राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या मुद्द्यावरसुद्धा निर्णय होणं अपेक्षित होतं. अजित पवारांच्या तब्येतीमुळे ही बैठक रद्द करण्यात आल्याची चर्चा मंत्रालयात आहे.

अजित पवारांनी शनिवारी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली होती. शनिवारी बारामती आणि परिसराची पाहाणी त्यांनी केली. सोलापूर आणि पंढरपूरचा दौरासुद्धा त्यांनी केला आहे.

या दौऱ्यांदरम्यान अजित पवार यांचं जेवणाकडे दुर्लक्ष झालं त्यामुळे त्यांची तब्येत बिघडल्याचं त्यांच्या निकटवर्तीयांचं म्हणणं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील आणि नवाब मलिक यांनी सांगितले की अजित पवार यांची तब्येत चांगली आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री 8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)