अमित ठाकरे यांना लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज

फोटो स्रोत, Instagram / Amit Thackeray
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना ताप आल्यामुळे 19 ऑक्टोबर रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना आता डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती डॉ. जलील पारकर यांनी दिली आहे.
सध्या मुंबईतल्या लिलावती रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांना भेटण्यासाठी राज ठाकरे हेसुद्धा रुग्णालयात गेले होते.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
अमित ठाकरे यांना दोन दिवसांपासून ताप येत होता. खबरदारी म्हणून ते रुग्णालयात भरती झाले आहेत. त्यांची कोव्हिड टेस्ट निगेटिव्ह आली आहे. याशिवाय त्यांची मलेरिया टेस्ट करण्यात आली, ती सुद्धा निगेटिव्ह आल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.
अमित ठाकरे डॉ. जलील पारकर यांच्या देखरेखीखाली लिलावती रुग्णालयात दाखल झाले होते. अमित यांना व्हायरल ताप असल्याचं डॉ. पारकर म्हणाले. काळजीचं काही कारण नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून दोन दिवसांत त्याना दवाखान्यातून सुट्टी दिली जाईल, असं डॉक्टरांनी सांगिल्यांचं मीडियामध्ये आलं आहे.
अमित ठाकरे यांच्या तब्येतीविषयी मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी बीबीसी मराठीला सांगितलं, "थोडा ताप आलाय म्हणून अमित ठाकरे यांना लिलावती हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं आहे. त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. ताप कशामुळे आला हे चेक करण्यासाठी त्यांना डॉक्टरांच्या निरिक्षणाखाली ठेवण्यात आलं आहे. दोन-तीन दिवसांत त्यांना डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे."
काही दिवसांपूर्वी मनसेनं अमित ठाकरेंकडे पक्षात नवीन जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मार्च महिन्यात वाशी येथे झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात मनसेच्या शॅडो कॅबिनेटची घोषणा करण्यात आली. या कॅबिनेटमध्ये अमित ठाकरे यांच्याकडे पर्यटन विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे.
अमित ठाकरे गेल्या पाच वर्षांपासून ते पक्षाच्या कार्यक्रमांमध्ये सक्रिय आहेत. गेल्या काही काळात पक्षातला त्यांचा वावर वाढलाय, पक्षाच्या बैठकांनाही त्यांची हजेरी असते, मनसेच्या आंदोलनांमध्येही ते वेळोवेळी दिसताहेत.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
उद्धव ठाकरेंच्या शपथविधी दिवशी (26 नोव्हेंबर) अमित ठाकरे यांच्या नेतृत्वात मनसेनं नवी मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या वाढीव वेतनाच्या थकित रकमेसंदर्भात थाळीनाद आंदोलन केलं होतं. त्याआधी जुलै महिन्यात पक्षाचं शिष्टमंडळ घेऊन रेल्वे प्रवाशांच्या मागण्यांसाठी ते रेल्वेच्या अधिकाऱ्यांना जाऊन भेटले होते.
पर्यावरणविषयक मुद्द्यांवरही त्यांनी वारंवार मतप्रदर्शन केलं आहे. 'आरे'तील वृक्षतोडीवरून मुंबईत घमासान माजलेले असताना त्यांनी सोशल मीडियावर ही झाडं तोडण्याच्या विरोधात भूमिका घेतली होती.
मजकूर उपलब्ध नाही
Facebookवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.Facebook पोस्ट समाप्त
वडील राज ठाकरे यांच्यासोबत विविध दौऱ्यांमध्ये, सभांमध्ये अमित त्यांच्यासोबत कायम असतात, जणूकाही नवीन जबाबदारीसाठी त्यांना तयार केलं जात आहे. गेल्या वर्षी 'ईव्हीएम'च्या मुद्द्यावर राज ठाकरे जेव्हा कोलकात्याला ममता बॅनर्जींची भेट घ्यायला गेले होते, तेव्हाही अमित त्यांच्यासोबत होते.
जेव्हा राज ठाकरेंची 'ईडी'कडून दिवसभर चौकशी झाली होती, तेव्हा अमित कुटुंबीयांसमवेत दिवसभर 'ईडी'च्या कार्यालयाबाहेर उपस्थित होते.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.