IPL 2020: आयपीएल गुणतालिका

Published
वाचन वेळ: 1 मिनिटे

आयपीएलच्या तेराव्या हंगामाचा पहिला टप्पा संपून दुसरा टप्पा सुरू झाला. आता लढाई सुरू झालेय प्लेऑफ्ससाठी टॉप4 मध्ये स्थान पटकावण्याची.

यंदाच्या आयपीएल स्पर्धेत आठ संघ आहेत. प्रत्येक संघ अन्य सात संघांशी दोनदा मुकाबला होतो. आयपीएलच्या नियमानुसार मॅच जिंकणाऱ्या संघाला दोन गुण मिळतात. काही कारणांमुळे मॅच रद्द झाल्यास दोन्ही संघांना एकेक गुण विभागून देण्यात येतो.

एखाद्या संघाने सर्वच्या सर्व मुकाबले जिंकले तर त्यांचे 28 गुण होऊ शकतात. तसं झालं तर तो संघ अगदी सहजपणे प्लेऑफ्ससाठी पात्र ठरू शकतो.

जास्तीत जास्त मॅच जिंकून स्वबळावर प्लेऑफ गाठण्याचा संघांचा प्रयत्न असतो. प्लेऑफसाठी पात्र होण्याकरता संघाचे किमान 16 गुण होणं आवश्यक असतं.

14 किंवा त्यापेक्षा कमी गुण असतील तर नेट रनरेटद्वारे पुढे कोण जाणार हे ठरतं. आयपीएलच्या आधीच्या हंगांमांकडे पाहिलं तर चौथ्या स्थानासाठी प्रचंड चुरस पाहायला मिळते. अनेकदा तीन संघांचे समान गुण झालेले असतात. नेटरनरेटद्वारे चौथ्या स्थानी कोण असेल याचा फैसला होतो. अनेकदा संघांना स्वत:च्या कामगिरीच्या बरोबरीने गणितीय समीकरणांवर अवलंबून राहावं लागतं.

15 ऑक्टोबर रोजी गुणतालिका अशी आहे

आता संघांसाठी प्रत्येक मॅच महत्त्वाची आहे. पराभवाला सामोरं जावं लागल्यास अंतर कमी राखण्याचा संघांचा प्रयत्न असेल. जेणेकरून नेट रनरेट चांगला राहील.

ऑरेंज कॅप

हंगामात सर्वाधिक रन्स करणाऱ्या बॅट्समनला ऑरेंज कॅपने सन्मानित करण्यात येतं.

परपल कॅप

हंगामात सर्वाधिक विकेट्स पटकावणाऱ्या बॉलरला परपल कॅपने गौरवण्यात येतं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)