ISIला माहिती पुरवल्याच्या आरोपाखाली HALच्या कर्मचाऱ्याला नाशिकमधून अटक

सुखोई

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, सुखोई लढाऊ विमानाचा प्रातिनिधिक फोटो
    • Author, प्रवीण ठाकरे
    • Role, बीबीसी मराठीसाठी
  • Published
  • वाचन वेळ: 2 मिनिटे

पाकिस्तानच्या ISI या गुप्तहेर संघटनेस भारतीय बनावटीच्या विमानाची माहिती पुरविणाच्या आरोपाखाली हिन्दुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या (HAL) एका कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे.

दहशतवाद विरोधी पथकाचे (ATS) अधिकारी विनोद राठोड यांनी याबाबत प्रसार माध्यमांना अधिक माहिती दिली आहे.

नाशिकच्या ओझरमध्ये HALचा विमाने बनवण्याचा कारखाना आहे. याठिकाणचा एक कर्मचारी परदेशी व्यक्तीच्या संपर्कात असून तो भारतीय बनावटीची विमानं आणि HAL कारखान्याबाबत संवेदनशील माहिती पुरवत आहे, अशी माहिती ATSच्या नाशिक युनिटला मिळाली. या गोपनीय माहितीच्या आधारे नाशिक ATSने ही कारवाई केल्याचं सागण्यात आलं आहे.

" अटक केलेला कर्मचारी या कारखान्यात सिनिअर सुपरवायझर म्हणून काम करायचा. तो सोशल मीडियाच्या माध्यमातून ISI च्या पाकिस्तानी हँडलरच्या संपर्कात होता. त्यासाठी व्हॉट्सअॅप आणि इतर सोशल मीडिया माध्यमांचा वापर करण्यात येत होता. त्याने वेळोवेळी विमाने आणि कारखान्यांबाबत माहिती पाकिस्तानी हँडलरला दिली होती," अशी माहिती विनोद राठोड यांनी दिली.

" आरोपीने ISIच्या हँडलरला आतापर्यंत भारतीय बनावटीची विमानं, त्यांची तांत्रिक बनावट आणि इतर तपशिलाची आणि HAL कारखान्यातील प्रतिबंधित क्षेत्रांची गोपनीय माहिती पुरवल्याचं आढळून आलं आहे."

विमान

फोटो स्रोत, hal-india.co.in

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक फोटो

याप्रकरणी त्याच्याविरोधात कलम 3, 4 आणि 5 अंतर्गत शासकीय गुपिते अधिनियम 1923 अन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.

त्याच्याकडून 3 मोबाइल हँडसेट, 5 सिमकार्ड, 2 मेमरी कार्ड जप्त करण्यात आले आहेत. या वस्तू विश्लेषणासाठी फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीत पाठवण्यात आल्या आहेत.

आरोपीला दहा दिवसांची पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे, अशी माहिती राठोड यांनी दिली.

सध्यातरी या प्रकरणावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास HAL ने नकार दिला आहे.

"या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू आहे. त्यामुळे आता लगेच याबाबत प्रतिक्रिया देता येणार नाही. लवकरच याबाबत अधिक माहिती सर्वांना दिली जाईल," असं HAL च्या प्रवक्त्यांनी म्हटलं आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)